पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/47

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

संवत्सरस्याग्निमाधाय ॥ पापीयान भवति ॥ उत्तरयोरादधात ॥ एषा व प्रथमा रात्रिः संवत्सरस्यं ।। यदुत्तरफल्गुनी ।। मुखत एव संवत्सरस्याग्निमाधाय ॥ वसायान् भवति । तै. बा.१.१.२.८. पूर्वफल्गुनीवर अग्न्याधान करूं नये. पूर्वफल्गुनी ही संवत्सराची शेवटची रात्रि ...उत्तरफल्गुनीवर आधान करावे. ही संवत्सराचा पहिला रात्रि. यांत पौर्णिमा असा शब्द नाहीं तरी पूर्वफल्गुनी ज्या पूर्णिमेस येतात ती पूर्णिमा असा उद्दिष्टार्थ आहे, असे दिसते. ह्मणजे फल्गुनावर चद्र पूर्ण होतो ही कल्पना यांत आली. तथापि यांत फाल्गन हा शब्द नाही एवढेच नाही, तर फल्गुनीपूर्णमास असें वर संहितेंतील वाक्यांत आले आहे तसहा यात नाहा. वरील वाक्यांवरून नक्षत्रावर चंद्र पूर्ण होणे ही गोष्ट तैत्तिरीयसंहिताब्राह्मणकाली लक्ष्यांत आली होती, असे दिसते. परंतु त्या काली चैत्रादि नांवें पडली नव्हती असें स्पष्ट दिसते, हे लक्ष्यांत ठेविले पाहिजे. एषा ह संवत्सरस्य प्रथमा रात्रिर्या फाल्गुनी पूर्णमासी ॥ शतपथब्राह्मण. फाल्गुन्यां पौर्णमास्यां चातर्मास्यानि प्रयंजीत । मुखं वा एतत्संवत्सरस्य यत्फाल्गनी पौर्णमासी। गोपथब्राह्मण. ६. १९. यांत “फाल्गुनी पूर्णमासी" असे शब्द आहेत. सांख्यायन ब्राह्मणांतही या वैषा फाल्गुनी पौर्णमासी संवत्सरस्य प्रथमा रात्रिः । असें वाक्य आहे असें मणतात. (मी तें ब्राह्मण पाहिले नाही). असो; या सर्व वाक्यांतील 'फाल्गनी' याचा अर्थ 'फल्गुनीनक्षत्रयुक्त' एवढाच आह. शतपथबाह्मण २.६.३ यांत 'फाल्गनी पूर्णमासी' असे शब्द आले आहेत. त्यांची व्याख्या सायणाचार्यांनी 'फल्गुनीभ्यां युक्ता पौर्णमासी फाल्गुनी अशीच केली आहे. सामविधान ब्राह्मणांत. या रोहिणी वा पौषी वा पौर्णमासी. सामवि. बा. २. ४. असें वाक्य आहे. यांत रोहिणी' याचा अर्थ 'रोहिणीयुक्त ' एवढाच आहे, 'रौहिणमाससंबंधी' असा नव्हे, त्याप्रमाणेच पौषी, फाल्गुनी इत्यादिकांचा अर्थ तत्तन्नक्षत्रयुक्त एवढाच होय. सारांश फाल्गुनी इत्यादि संज्ञा मात्र ब्राह्मणकाली प्रचारांत आल्या होत्या. फाल्गन, चैत्र इत्यादि मासनामें संहिताबाह्मणांत कोठेही आली नाहीत. यावरून तेव्हां ती प्रचारांत आली नव्हती. फाल्गुनी इत्यादि संज्ञा प्रचारांत आल्यावरही फाल्गुन इत्यादि संज्ञा व्यवहारात येण्यास बराच काल लोटला पाहिजे. शास्त्रीय सिद्धांत स्थापित होण्यास किती काल लागत असतो याचा सूक्ष्म विचार केल्यावर हे सहज लक्ष्यांत येईल. सारांश चैत्रादि संज्ञा संहिताबाम्हणकालीं प्रचारांत नव्हत्या. यावरून मध्वादि संज्ञांनंतर दीर्घ कालांतराने चैत्रादि संज्ञा प्रचारांत आल्या असें ऐतिहासिकरीत्या सिद्ध होते.