पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/454

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१५) आली नाही, यावरूनही हे दोन श्लोक मागाहून आले असतील असें अनुमान होतें. तथापि या तारांपैकी अपांवत्स या तारेचा उल्लेख बृहत्संहितेंत आहे.* यावरून या तीनही तारांचे ज्ञान शक ४२७ ह्या काळीही होते. प्रजापति, अपांवत्स, आप ह्या तारा शाकल्यब्रह्मसिद्धांतांत आल्या नाहीत असें प्रो. व्हिटने ह्मणतो. परंतु ती चूक आहे. शाकल्यबह्म, रोमश, आणि सोम ह्या तीनही सिद्धांतांत त्या आहेत. ग्रहलाचवांत ह्यांपैकी आप मात्र नाही. शाकल्यब्रह्मसिद्धांतांत सप्तर्षीचे शरभोग आहेत. ते इतर कोणत्याही ग्रंथांत नाहीत. यंत्रराज ग्रंथांत ३२ तारांचे सायन भोगशर आहेत. सिद्धांतराज ग्रंथांत ८४ तारांचे आहेत. कांहीं नक्षत्रांची तारा एकच आहे. काहींच्या जास्त आहेत. अनेक आहेत त्यां . पैकी योगताग कोणत्या दिशेची हे सूर्यादि चार सिद्धांतांत नक्षत्रतारासंख्या. ___सांगितले आहे व ते बहुधा एकसारखेच आहे. परंतु त्यावरुन योगतारेचा बोध चांगला होत नाही. या चोहोंपैकी शाकल्यबह्मसिद्धांतांत मात्र नक्षत्राच्या तारा किती हे सांगितले आहे, इतरांत नाही. हे सांगितल्याशिवाय नुस्त्या दिशा सांगण्याचा विशेष उपयोग नाही. शाकल्यब्रह्मसिद्धांताशिवाय गणितग्रंथांपैकी खंडखाद्यांत मात्र नक्षत्रयोगतारासंख्या आहेत. कांहीं संहिताग्रंथांत त्या आढळतात. नक्षत्रांच्या तारासंख्येविषयी मतभेद आहे. पृष्ठ ४५८ यांतील कोष्टकांत निरनिराळ्या 11 ग्रंथांवरून नक्षत्रतारासंख्या दिल्या आहेत. त्यांत प्रथम तैत्तिरीय श्रुतीवरून पहिल्या भागांत सांगितल्याप्रमाणे निश्चयाने कळणाऱ्या संख्या दिल्या आहेत. नक्षत्रकल्पा हे अथर्ववेदाचे परिशिष्ट आहे. श्रीपतिकृत रत्नमालेचा टीकाकार माधव यानें लल्लोक्त नक्षत्रसंख्या दिल्या आहेत त्यांवरून मी दिल्या आहेत. त्या बहुधा रत्नकोशांतून घेतल्या असाव्या. नक्षत्रतारासंख्यांविषयी मतभेद आहे तरी इष्ट नक्षत्रपुंज आकाशांत कोणते याविषयीं मतभेद नाहीं, असें सर्व दृष्टींनी विचार केला असतां दिसून येते. शतभिषक् या शब्दांतील शत शब्दावरून त्याच्या तारा १०० असा भ्रम पडला, व त्यामुळे शतभिषक् या मूळच्या नांवाबद्दल शततारा असें नांव पडले. परंतु ही समजूत वराहमिहिरापासून आहे. तसेच सर्वांच्या मतें रेवतीयोगताराशर शून्य आहे; भोगही शून्याजवळ आहे. तेव्हां रेवती योगतारेविषयी मतभेद नाही. तिच्या आसपास मृदंगाकारांत बऱ्याच तारा आहेत. परंतु त्या ३२ च असतील असें नाही. परंतु ही संख्या कशावरून मानली नकळे. परंतु तीही वराहापासून आहे. बाकी सर्व नक्षवांचे प्रदेश आकाशांत पाहिले असतां प्रत्येकानें मानलेल्या संख्येस काहींना काही आधार आहे असे दिसून येते. तेव्हा सर्वांच्या संख्या सयुक्तिकच आहेत.

  • सममुत्तरेण तारा चित्रायाः कीर्त्यते ह्यपांवत्सः ॥

बृहत्संहिता, अध्याय २५ पद्य ४. 1 बजेसचें सू. सि. भाषांतर पृ. २१८. + नक्षत्रकल्प आणि वृद्ध गर्गसंहिता ही मी प्रत्यक्ष अद्यापि पाहिली नाहीत. प्रो. थिबो याने इंडि० आंटिक्करि पु.१४ पृ.४३-४५ यांत दिलेल्या माहितीवरून त्यांतल्या संख्या मी दिल्या आहेत. प्रो. थिबोनें वृद्धगर्गसंहिता आणि खंडखाद्य यांतील मूळ वचने दिली आहेत. त्याच्या लिहिण्यांत रेवती आणि अश्विनी यांसंबंधे चूक आहे ती मी दुरुस्त केली आहे.