पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/453

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

( ५६) शर दिले आहेत, त्यांत काही मी दिलेल्यांहून भिन्न आहेत.ते असेः-भोग उत्तराभाद्रपदा ३३६, शर, मृग ५, आश्रेषा ६, मूळ ९॥. यांत बेरुणीच्या ग्रंथांत मूळचा किंवा मागच्या लेखकांचा काही प्रमाद असावा. ब्रह्मगुप्तोक्त भोगशर मी वर दिले आहेत त्यांच्या संख्या मूळच्या आर्यावद्ध आणि शब्दबद्ध आहेत, आणि त्या ब्रह्मगुप्तासि-- द्धांत आणि खंडखाद्य या दोन ग्रंथांत एकच आहेत. आणि त्या ग्रंथांच्या निरनिराळ्या चार प्रतीवरून त्या मी घेतल्या आहेत. तेव्हां त्यांविषयी संशय नाही. क-- त्तिका, रोहिणी, चित्रा, विशाखा, अनुराधा, ज्येष्ठा यांचे शर ब्रह्मगुप्ताने यथाक्रम ५, ५, २, १, ३, ४ असे प्रथम सांगितले आहेत व ते बेरुणीने दिले आहेत. परंतु यांचे शर अमुक अमुक कला कमी असें ब्रह्मगुप्ताने मागाहून लागलेच सांगितले आहे. त्याप्रमाणे कमी करून मी दिले आहेत. तसें बेरुणीने केले नाही. मूळाचा शर 'अर्धनवम ' सांगितला आहे. बेरुणीनं तो ९॥ दिला आहे. परंतु 'अर्धनवम याचा अर्थ '८।।' असा होय. वर सांप्रतच्या मूर्यसिद्धांतांतील ध्रुव दिले आहेत त्यांत आदींच्या भुवाविषयी मतभेद आहे. सूर्यसिद्धांतटीकाकार रंगनाथ याच्या लिहिण्यावरून दिसते की आभिोग नार्मदमतें ७३।४७ आणि पर्वतमा ७३।१० आहे, आणि सर्वजनाभिमत ध्रुव ७४५० असेंही रंगनाथ ह्मणतो. परंतु शाकल्यसंहितोक्त आध्रुव ६७२० आहे ह्मणून रंगनाथानें तोच घेतला आहे.* सिद्धांततत्वविवेककार कमलाकर याने सर्व भोगशर सूर्यसिद्धांतांतले घेतले आहेत, परंतु त्यांत आभोग ७४५० दिला आहे. सांप्रतचे रोमश, सोम, आणि शाकल्योक्तब्रह्म, हे सिद्धांत सूर्यसिद्धांताचे अनुयायी आहेत. त्याप्रमाणे नक्षत्रांचे भोगशर यांतही आहेत. मात्र त्यांत आविषयी मतभेद आहे. शाकल्यब्रह्मसिद्धांतांतले भोगशर सर्वांशी वर दिलेल्या सूर्यसिद्धांतांतल्यांप्रमाणे आहेत. सोमसिद्धांतांत आर्द्राभोग ७४।५० आहे. बाकी सर्व भोग आणि शर वरील सूर्यसिद्धांतांतल्याप्रमाणे आहेत. रोमशसिद्धांताच्या दोन प्रती मी मिळविल्या होत्या. त्यांत कांहीं ध्रुव सूर्यसिद्धांताहून भिन्न आहेत. परंतु लेखनप्रमादामुळे तो भेद झालेला दिसतो. एकंदरीत रामशसिद्धांताचे ध्रुवशर सूर्यसिद्धांतांतल्याप्रमाणे आहेत असें ह्मणण्यास हरकत नाही. सूर्यसिद्धांतांत नक्षत्रयोगतारांचे भोगशर ९ श्लोकांत (अधिकार ८.)सांगितल्यावर पुढे ३ श्लोकांत अगस्त्य, व्याध, अग्नि, ब्रह्मा, यांचे सांगितले आहेत. पुढे लागलीच प्रजापति, अपांवत्स, आप यांचे नाहीत. मध्ये ७ श्लोकांत दुसरा विषय सांगून पुढे पुन्हा शेवटी २० व २१ या दोन श्लोकांत प्रजापति इत्यादि तिहींचे भोगशर आहेत. यावरून ते मागाहून प्रक्षिप्त असतील असे दिसते. नवव्या आधिकारांत अमुक तारा कधीच अस्त पावत नाही असे म्हटले आहे. त्यां ब्रह्महृदय आली आहे, त्या अर्थी या तिहींपैकी प्रजापति आली पानि कारण ब्रह्महृदयापेक्षा प्रजापतिशर ८ अंश जास्त उत्तर आहे.-

  • सांप्रतचे सूर्य, रोमश, शाकल्य ब्रह्म, सोम सद्धांतांत नक्षत्रवत । त्या नक्षत्रप्रदेशाच्या आरंभापासून तारे

कला त्यांले आहेत. सूर्यसिद्धांतांत आद्र यः १९" “गोमयः३० -