पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/424

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

क्षत्रं चुकतात. आमच्या ग्रंथांप्रमाणे येणारें में आरंभस्थान में प्रतिवर्षी रेवतीयोगतारेच्या पुढे ८५ विकला जातें असें मागें (पृ. ३३९) सिद्ध केलेच आहे. वरील कोष्टकावरून दिसेल की, सांप्रत सूर्यसिद्धांतागत आरंभस्थानापासून जे २७ विभाग त्यांत ७ नक्षत्रांच्या योगतारा आपापल्या विभागाच्या मागे आहेत. ह्मणजे दिननक्षत्र मृग असतां चंद्राचा समागम मृग आणि आर्द्रा या दोन तारांशी होतो. याप्रमाणे सातांचे होते. आणखी ५ हजार वर्षांनी उत्तराभाद्रपदा खेरीजकरून सर्व तारा आपापल्या नक्षत्रप्रदेशाच्या मागे पडतील. ह्मणजे दिननक्षत्र अश्विनी आणि चंद्रसमागम भरणीशी असें २६ नक्षत्रांचे होईल. ७४०० वर्षांनी उत्तराभाद्रपदा तारेची हीच व्यवस्था होईल. सारांश आमच्या चालू निरयन पद्धतीने नक्षत्रांची अवस्था सायन नक्षत्रांसारखीच होय. दोन खस्थांचे भोग सारखे झाले झणजे त्यांची युति समजावी असे युतीचें लक्षण केले तर ती भोगयुति होय. आणि दोन खस्थांचे विषुवांश सारखे झाले झणजे त्यांची युति होते असे लक्षण केले तर ती विषुवयुति होय.सायन पंचांगांत विषुवयुति असतात. प परिशिष्टांत दिलेल्या सूक्ष्म निरयन पंचांगांत विषुवयुतिच आहेत. ते पंचांग ग्रहलाववाप्रमाणे अयनांश धरून नाटिकल आल्मनाकवरून केले आहे. त्यांत आर्द्रा, आश्लेषा, ज्येष्ठा, मूल, पूर्वाषाढा, उत्तराषाढा, श्रवण, धनिष्ठा हीं (८) दिननक्षत्रे लागण्यापूर्वीच त्यांच्या योगतारांशी चंद्राची विषुवयुति होते. तसेच त्या पंचांगांतील ताराचंद्रयुति केरोपंती पंचांगाशी ताडून पाहिल्या असतां दिसतें की केरोपंती पचांगांतील उत्तराषाढा, श्रवण, धनिष्टा, हीं नक्षत्रे लागण्यापूर्वीच आणि पुनर्वसु, पुष्य, पूर्वाफल्गुनी, व शततारका, ही नक्षत्रे संपल्यावर चंद्राशी (व इतरांशीही) त्यांच्या विषुवयुति होतात. सारांश कसेंही मूक्ष्म निरयनमान घेतले तरी नक्षत्रांत चुकी रहातेच. आतां मासांचा विचार करूं. सायन महिने घेतले तर, ज्या महिन्यांत तारात्मक चित्रांवर चंद्र पूर्ण होईल तो चैत्र ही *परिभाषा व्यर्थ होईल चैत्रादि संज्ञा योगिक हे खरे. परंतु सांप्रत काय अवस्था आहे ? ज्या नक्षत्री चंद्र नाहींत. पूर्ण होईल त्यावरून महिन्यास नांव द्यावयाचे हा नियम प्रत्यक्ष व्यवहारांतून सोडून दिल्यास निदान वेदांगज्योतिषाइतकी झणजे सुमारे ३३०० वर्षे झाली. त्यापूर्वी किती वर्षे तो नियम सुटला नकळे. चैत्रादि संज्ञा उत्पन्न झाल्या त्या मात्र त्या नियमाने; परंतु चैत्रांत चित्रांजवळच चंद्र नेहमीं पूर्ण होतो असें नाही, असे दिसून आल्यावर काही महिन्यांस दोनदोन आणि काहींस तीन तीन नक्षत्रं वांटन दिली. परंतु योगतारा सारख्या अंतरावर नसल्यामुळे पुढें विभागात्मक नक्षत्रे मानावी लागली. वेदांगज्योतिषांत विभागात्मक नक्षत्रे आहेत. सांगतचे ज्योतिषसिद्धांत उत्पन्न झाले तेव्हांपासून विभागात्मक मूक्ष्म नक्षत्र पूर्ण प्रचारांत आली आणि “मेषसंक्रमण ज्या महिन्यांत होईल तो चैत्र " अशी परिभाषा होऊन त्याप्रमाणे सांप्रत चालत आहे. केरोपंती पंचांगांत शक १८०४ पासून चार वर्षांत आणि शक १८१० मध्ये प्रति पूर्णिमान्तीं कोणते नक्षत्र होते हे खालील कोष्टकांत दिले आहे. •सायन चैत्र पूर्णिमेस सायन चित्रा किंवा एखादें मागचे पुढचे नक्षत्र असेलच. + याविषयी जास्त विवेचन पूर्वी (पृ.३९०) मासनामविचारांत केले आहे. * यांत श. १८०५, १८०७ आणि २८१० या वर्षी त्या पंचांगाप्रमाणे अनुक्रमें चैत्र, श्रावण, आषाढ हे मास अधिक आहेत.