पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/39

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

संवत्सराचे ३६० दिवस. संवत्सराचे दिवस आणि रात्रि [ मिळून ] एकंदर ७२०. द्वादशारत्नी रशना कर्तव्याश्त्रयोदशारत्नी रिति ॥ ऋषभो वा एष ऋतूनां ॥ यत्संवत्सरः ॥ तस्य त्रयोदशो मासो विष्टपं ।। ऋषभ एष यज्ञानां । यदश्वमेधः । यथा वा ऋषभस्य विष्टपं ॥ एवमेतस्य विष्टपं ।। तै. बा. ३. ८. ३. [अश्वमेधामध्ये ] रशना बारा अरत्नींची करावी की तेरा अरत्नींची? संवत्सर हा ऋतूंचा ऋषभ (श्रेष्ठ ). तेरावा मास हे त्याचे विष्टप (कोळे). अश्वमेध हा यज्ञामध्ये श्रेष्ठ. जसें ऋषभाला (वृषभाला) विष्टप तसेच त्याचे विष्टप. वर जी वाक्ये दिली आहेत त्यांवरून वेदकाली वर्ष सौरमानाचें होते हे स्पष्ट आहे. दिवस समजण्याचे स्वाभाविक साधन जसें दोन सूर्योदयांमधील काल; मास समजण्याचे स्वाभाविक साधन जसें चंद्र दोन वेळा पूर्ण होण्याच्या मधला काल; तसें वर्ष समजण्यास स्वाभाविक साधन ऋतूंचा एक पर्याय होय. आणि ऋतु हे सूर्यामुळे होतात. ऋतु जर नसते तर वर्ष में एक कालमान झालेच नसते. तेव्हां वर्ष में सौरच असले पाहिजे हे उघड आहे. आतां अगदी प्रथम पाहूं गेले असतां सामान्यतः १२ चांद्रमासांत ऋतूंचा एक पर्याय होतो, असें वाटणे साहजिक आहे. वस्तुतः १२ चांद्रमास व आणखी सुमारे ११ दिवस इतक्या कालांत ऋतूंचा एक पर्याय होतो. तरी इतकें मूक्ष्ममान प्रथमच लक्ष्यांत येणे कठिण आहे. म्हणून बराच कालपर्यंत १२ चांद्रमासांचेंच वर्ष मानीत आले असतील. परंतु असे केल्याने पहिला ह्मणून जो मास मानला असेल तो प्रथम उन्हाळ्यांत असेल तर पुढें हिवाळ्यांत, पुढें पावसाळ्यांत, असा उत्तरोत्तर मागे येऊ लागला पाहिजे. व हल्लीच्या मुसलमानांच्या मोहोरमाप्रमाणे सुमारे ३३ वर्षांत तो सर्व ऋतूंतून भ्रमण करणार. म्हणून असे ३३ वर्षांचे कितीएक पर्याय गेल्यावर अधिकमास घालण्याची कल्पना मनांत येण्याचा संभव आहे. व असा अधिकमास वेदकाळी धरीत होते. यावरून वर्ष सौर होते हे सिद्ध होते. आतां सांप्रतच्या काली ही गोष्ट अगदी क्षुल्लक दिसते. परंतु इतक्या प्राचीनकाली आमच्या लोकांत अधिक मासाची कल्पना निघाली ही गोष्ट कांहीं सामान्य नाही. फार महत्वाची आहे. पृथ्वीवर एका काली फार प्रबळ असलेलें जें प्राचीन रोमनराष्ट्र त्यांत पुष्कळ काळपर्यंत १० महिन्यांचें वर्ष होते. आमच्या ज्या वेदांत अधिकमासाचा उल्लेख आहे त्यांतील काही भाग इ० स० पूर्वी १५०० वर्षांच्या पूर्वीच झाले असें युरोपिअन विद्वानही मानितात. वरील वाक्यांत अधिकमासाचा उल्लेखही काही विलक्षण गोष्ट ह्मणून केला नाही. तेव्हां त्यापूर्वीच पुष्कळ वर्षे ती कल्पना निघून अगदी साधारण होऊन गेली होती, असे दिसते. आतां अधिकमास घालीत असत तो किती महिन्यांनी धरीत असत हे समजण्यास काही साधन नाही. सांप्रत चालू असलेल्या मानाने मध्यम मानाने सुमारे ३७३३ महिन्यांनी एक अधिकमास धरावा लागतो. स्पष्ट मानाने कमजास्त महिन्यांनी अधिकमास पडतो, तरी सरासरीने ३२/३३ महिन्यांनीच पडतो. वेदांगज्योतिषाच्या रीतीप्रमाणे ३० महिन्यांनी अधिकमास पडत असे. तर याप्रमाणेदका किती महिन्यांनंतर अधिकमास धरीत हे समजत नाही. त्याबद्दल कांहींतीति वीम असलाच पाहिजे.