पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/37

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सत्य भूत [आदित्या ]. बारा अरे असलेलें चक्र द्युलोकासभोंवतीं सदैव भ्रमण करीत असते तरी नाश पावत नाही. हे अग्ने या [चक्रावर पुत्रांची ७२० जाडमा आरुढ झालेली असतात. द्वादश प्रधयमक्रमेकं त्रीणि नभ्यानि क उ तचिकेत ॥ तस्मिन्त्साकं विशता न शंकवोऽपिताः षष्टिन चलाचलासः ॥ क्र. सं. १.१६४. ४८. बारा परिधि, एक चाक, तीन नाभि, हे सर्व कोणाला समजतें? त्या (चाका)ला शंकूप्रमाणे ३६० चंचल अरे एक लगत लावलेले आहेत. या दोन चांतील चमत्कारिक वर्णन संवत्सर, बारा, मास, ३६० दिवस यांस अनुलक्षून आहे, हे उघड आहे. संवत्सर हेच कोणी चक होय. ह्यास बारा मास हेच १२ अरे होत. आणि ३६० दिवस हे ३६० खिळे होत. रात्रदिवस हे एक मिथुन होय. अशी ३६० जोडपी झणजे रात्री व दिवस मिळून ७२० होतात. मधुश्च माधवश्च शुक्रश्च शुचि नभय नभस्यश्चेषश्चोर्जश्च सहश्च सहस्यश्च तपश्च तपस्यश्चोपयामगृहीतोऽसि स सोस्य हस्पत्याय त्वा । तै. सं. १.४.१४. [हे सोमा तूं ] उपयामाने (स्थालीने ) घेतलेला आहेस. मधु आहेस, माधव आहेस.... यांत मधु, माधव, शुक्र, शुचि, नभस्, नभस्य, इष, ऊज, सहस्, सहस्य, तपस्, तपस्य, ही महिन्यांची बारा नांवें आली आहेत, आणि संसर्प हे अधिमासाचें नांव आले आहे. यावरील भाष्यांत माधव ह्मणतो की अंहस्पति ह्मणजे क्षयमास. मधुश्च माधवश्च वासंतिकावृतू शुक्रश्च शुचिश्च त्रैष्मावृतू नभश्च नभस्यश्च वाषिकावृतू इषश्चोर्जश्च शारदावृतू सहश्च सहस्यश्च हैमंतिकावृतू तपश्च तपस्यश्च शौशिरावत ॥ तै. सं. ४.४.११. मधु आणि माधव हे वसंताचे मास* होत. शुक्र आणि शुचि हे ग्रीमान नभस् आणि नभस्य हे वर्षाऋतूचे; इष आणि ऊज हे शरदाचे; सहस् आणि सहस्य हे हेमंताचे; आणि तपस् आणि तपस्य हे शिशिराचे. षडरात्रीर्दीक्षितः स्यात् षड् वा ऋतवः संवत्सरः ... द्वादश रात्रीदीक्षितः स्यात् द्वादश मासाः संवत्सरः ...... त्रयोदश रात्रीर्दीक्षितः स्यात् त्रयोदशमासाः संवत्सरः ...... पंचदशरात्रीदीक्षितः स्यात्पंचदश वा अर्धमासस्य रात्रयोधमासशः संवत्सर आप्यते .........चतुर्विशति रात्रीदीक्षितः स्याच्चतुर्विशतिरर्धमासाः संवत्सरः .... त्रि-शत-रात्रीदीक्षितः स्यात् निश्शदक्षराविराट् ..... मासं दीक्षितः स्यायो मास: स संवत्सरः ।। तै. सं. ५. ६. ७. संवत्सर ( होतो). बारा रात्रि सहा रात्रि दीक्षित असावें [ कारण ] सहा ऋतूंचा संवत्सर ( होतो ). बाग

  • मूलांत ऋतु शन्द मासवाचक योजिला आहे असें दितत.