पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/288

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वृत्त. (२८९) रंगनाथ. गोलग्रामस्थ प्रसिद्ध विद्वत्कुलांत हा झाला. (पृ. २८० वंशवृक्ष पहा). याचा जन्मशक सुमारे १५३४ असावा. सिद्धांतशिरोमणीवर याची मितभाषिणी नांवाची टीका आहे. सिद्धांतचूडामाणि नांवाचा याचा स्वतंत्र ग्रंथ आहे असें सुधाकर लिहितात. त्याचे १२ अधिकार आहेत व त्यांत ४०० श्लोक आहेत. तो सूर्यसिद्धांतानुसारी आहे. रंगनाथाने त्याचा रचनाकाल असा दिला आहे: मासानां कृतिरब्धि ४ हृद्युतिरसी खाजविहीना तिथिर्बाणै ५ हवि २ हतोडुवासरमितिरांग ६ भागात्पदं ॥ पक्षः सर्वयुतिः शको द्विखदिनै १५०२ युक्ता.। यावरून गणित करून पाहतां शके १५६५ पौष (१०) शुक्ल (1) पूर्णिमा (१५) आद्रा नक्षत्र (६) ब्रह्मयोग (२५) शुक्रवार (६) या दिवशी ग्रंथ समाप्त झाला* असें निघतें. नित्यानंदकृत सिद्धांतराज, शक १५६१ नित्यानंदाने विक्रमसंवत् १६९६ ह्मणजे शक १५६१ या वर्षी सर्वसिद्धांतराज ग्रंथ केला आहे. तो कुरुक्षेत्रासमीप इंद्रपुरी एथे राहणारा होता. आणि मुद्गलगोत्री, गौडकुलप्रसूत आणि अनुशासनाने डुलीनहट्ट होता. डुलीनहट्ट हे याचे परंपरागत मूलस्थान असें सुधाकर ह्मणतात. याच्या पितृपितामहादिकांची नांवें यथाक्रम देवदत्त, नारायण, लक्ष्मण, इच्छा अशी होती. सिद्धांतराज ग्रंथाचे गणिताध्याय आणि गोलाध्याय असे मुख्य दोन भाग आहे त. पहिल्यांत मीमांसा, मध्यम, स्पष्ट, त्रिप्रश्न, चंद्रग्रहण, सुअथवर्णन. इतराहून र्यग्रहण, शंगोन्नति, भग्रहयुति, छाया असे नऊ अधिकार विशेष. आहेत. गोलाध्यायांत भुवनकोश, गोलबंध, यंत्र असे अधिकार आहेत. एथवर वर्णिलेल्या सिद्धांतादि सर्व ग्रंथांपेक्षां यांत विशेष गोष्ट ही आहे की, हा ग्रंथ सायनमानाचा आहे. सायनगणनाच मुख्य होय, ती देवर्षिसंमत आहे, याविषयी सविस्तर विवेचन प्रथम मीमांसाध्यायांत केले आहे. ह्या ग्रंथांतील ग्रहांच्या प्रदक्षिणासंख्या इत्यादि माने अशी: कल्प ह्मणजे ४,३२,००,००,००० वर्षे इतक्या कालांत -- रवि ४३२००००००० शनि १४६८३५९८१ रव्युच्च १७१९४५ सावनदिवस १५७७८४७७४८१०१ -५७७५०९६८९६५ सौरमास ५१८४००००००० ४८८३२७१०३ अधिमास १५९०९६८९६५ २२९६९६८६३९ चांद्रमास ५३४३०९६८९६५ १७९३९५३४११४ तिथि १६०२९२९०६८९५० गुरु ३६४३५६६९८ क्षयाह २५०८१३२०८४९ शुक्र ७०२२१८०५३८ * या श्लोकावरून शक २५६२ मुधाकर यांणी काढिला आहे. परंतु ती नजरचुक आहे. त्या शकांत पौष शु. १५ तिथीस तिसरे नक्षत्र त्यांणी लिहिलेलं संभवत नाही. सहावें नक्षत्र येते. में धरून बेरीज १५६२ होत नाही.) चंद्रोच्च मंगळ बुध