पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/286

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(२८७) १०३७ शक १५४९ माघ शु०१० इंदुवार, ता०४ फेब्रुआरी इ. स. १६२८ या दिवशी सूर्योदयानंतर ३ घटिकांनी सुमुहूर्तावर राज्याभिषेक झाला. दिवाकर, जन्मशक १५२८. हागोलग्रामस्थ विद्वत्कुलांतील नृसिंहाचा पुत्र होय. (पृ २८० पहा). याचें जन्म शक १५२८मध्ये झाले. याचा चुलता शिव याजपाशी याणे अध्ययन केले. शक १५४७मध्ये वयाच्या १९ व्या वर्षी याणे 'जातकमार्गपद्म नांवाचा जातकग्रंथ केला. त्याला 'पद्मजातक । असेंही नांव आहे. केशवी जातकपद्धतीवर ह्याने प्रौढमनोरमा नांवाची टीका शक १५४८ मध्ये केली. तसेच आपल्या जातकपद्धतीवर गणिततत्त्वचितामणि नांवाची सोदाहरण टीका शक १५४९ मध्ये केली. पंचांगसाधक मकरंद ग्रंथावर याची मकरंदविवरण नांवाची सोदाहरण टीका आहे. व्याकरण, न्याय, काव्य, साहित्य यांत हा प्रवीण होता असे याच्या ग्रंथांवरून दिसते. मकरंदविवरण मी पाहिले आहे. बाकीचे वृत्त गणकतरंगिणीवरून दिले आहे. याचा भाऊ कमलाकर याणे याजपाशीं अध्ययन केले. कमलाकरहत सिद्धांततत्त्वविवेक. सिद्धांततत्त्वविवेक नांवाचा कमलाकरकत सिद्धांत आहे. कमलाकराचे वंशवृत्त वर विष्णूच्या वर्णनांत दिलेच आहे. (पृ० २८०). याचा जन्मशक सुमारे १५३० असावा. शके १५८० मध्ये काशी एथे तत्त्वविवेक ग्रंथ झाला. हा सर्वस्वी सांप्रतच्या सूर्यसिद्धांताचा अनुसारी आहे. सूर्यसिद्धांताविषयी कमलाकराचा अभिमान इतक्या अवस्थेस पोहोचला आहे की, सूर्यसिद्धांतांत जें नाहीं तें सर्व खोटें, तसेंच मूर्यसिद्धांतांत एकादी रीति स्थूल असून दुसन्या ग्रंथांत ती सूक्ष्म असली तरी ती खोटी असा याचा आशय दिसतो. उदाहरणार्थ, उदयांतरसंस्कार भास्कराचार्याने काटिला; परंतु मूर्यसिद्धांतांत तो नाही ह्मणून तो खोटा; तसेंच व्यासवर्गास १० नीं गुणून गुणाकाराचें वर्गमूळ काढावें झणजे परिधि येतो, ही सूर्यसिद्धांताची रीति खरी, याहून सूक्ष्म रीति भास्करादिकांनी दिलेली खोटी, असे सिद्ध करण्याचा याणे प्रयत्न केला आहे. याणे भगणमाने इत्यादि सर्व सूर्यसिद्धांतांतील घेतले आहे हे सांगावयास नकोच. काही श्लोक मूर्यसिद्धांतांतले अक्षरशः घेतले आहेत. या सिद्धांतांत मध्यम, स्पष्ट, त्रिप्रश्न, बिंब, छाया, शृंगोन्नति, उदयास्त, पर्वसंभव, चंद्रग्रहण, सूर्यग्रहण, भग्रहयुति, पात, महाप्रश्न असे १३ अधिकार आहेत. या सर्वामिळून निरनिराळ्या वृत्तांची सुमारे ३०२४ पयें आहेत. मधून मधून पुष्कळ गये आहेत. आणि ग्रंथाच्या मुख्य भागांत काही गोष्टींची उपपत्ति आली नाही ती पुढें शेषवासना ह्मणून एक प्रकरण देऊन त्यांत दिली आहे. हा ग्रंथ हल्ली काशी एथे “बनारस सिरीज" मध्ये सुधाकर द्विवेदि यांणी छापला आहे. कमलाकराचा दोष वर दाखविला आहे, तरी तत्पूर्वसिद्धांतांत नाहीत अशा पुकळ नवीन गोष्टी याच्या ग्रंथांत आहेत. त्या अशाः-संपातगतीमुळे ध्रुवनक्षत्रास अस्थिरत्व आहे, तसेंच सांप्रत जी ध्रुवतारा दिसते ती बरोबर धुवस्थानीं नाहीं, पूर्वरात्री व उत्तररात्री ती पाहिली असता तिचे स्थान बदलतें, असें याणे सांगितले