पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/238

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(२३९) उतंच सिद्धांतशिरोमणौ । अभीष्टवारार्थमहर्गणभेत सैको निरेक स्तिथयापि तहत ॥ तदाधिमासावमशेषके च कल्पाधिमासावमयुक्तहाने ॥ हा श्लोक भास्कराचार्याच्या सिद्धांतशिरोमणींत आहे. आणि यावरून पाहिले तर वरुण हा शक १०७२ नंतर झाला असें झटले पाहिजे; परंतु त्याच्या टीकेंतील अनेक उदाहरणांरून त्याचा काल सुमारे शक ९६२ आहे याविषयी काहींच संशय नाही. सदई टीकेंत हा श्लोक मागाहून कोणी तरी घातला असावा, असें स्पष्ट दिसते. किंवा सिद्धांतशिरोमणि नांवाचा दुसरा एकादा ग्रंथ शके ९६२ च्या पूर्वाचा असून त्यांत हा श्लोक अक्षरशः असल्यास परमेश्वर जाणे. राजमृगांक. हा करणग्रंथ आहे. यांत आरंभकाल शके ९६४ आहे. क्षेपक दिले आहेत ते शके ९६३ अमांत फाल्गुन कृष्णत्रयोदशीसह चतुर्दशी रविकाल. वार प्रातःकाल (मध्यम सूर्योदय) या वेळचे आहेत. हा ग्रंथ ब्रह्मसिद्धांतांतील ग्रहांस बीजसंस्कार देऊन केला आहे असें यांत कोठे सांगितले नाही, तरी ब्रह्मसिद्धांतांतील ग्रहांस यांतील बीजसंस्कार आधार. देऊन यांतील क्षेपक बरोबर मिळतात. ते क्षेपक असे आहेतः रा. अं. क. वि. रा. अं. क. वि. रवि १० २८ ४५० शुक्र ६ ७ ५२ ३९ चंद्र १० ९ २ ५३ शनि ६ २० र ३१ मंगळ८ २९४७ चंद्रोच्च ५१०३०४५ बुध ८१ ३३ १५ चंद्रपात २ १६ ५८ ५ गुरु ३.१०३० करणारंभींची मंदोच्चे आणि पात दिले आहेत, तेही ब्रह्मसिद्धांतांतले आहेत. यांत बीजसंस्कार सांगितला आहे तो काढण्याची रीति व तो संस्कार असाः नंदादींद्वग्नि ३१७९ संयुक्तान् भजेत् खाभ्राभ्रभानु २२००० भिः ।। शाकाब्दानविनष्टं तु भाजकाच्छेषमुत्सृजेत् ॥ २७ ॥ तयोरल्पं द्विशत्या २०० बीजं लिप्तादिकं पृथक् ।। त्रिभिः ३ शरै ५ वा १ व्य: ५२ र्बाणै ५ स्तिथिभि २५ राब्धिाभः ४ ॥ २८ ॥ द्विकेन २ यमले २ नैवं गुण्यमर्कादिषु क्रमात् ।। स्वं ज्ञशी धरासूनौ सूर्यपुत्रेपरेष्वृणं ॥ १९ ॥ मध्यमाधिकार. कता. ग्रंथाच्या शेवटी मटले आहे. इत्यवीपतिवृंदवंदितपदद्वंद्वेन सद्बुद्धिना ॥ श्रीभोजेन कृतं मृगांककरणं ज्योतिर्विदां प्रीतये ॥ यावरून भोजराजाने हे करण केले असें सिद्ध होते. वर सांगितलेला बीजसंस्कार प्रस्तुत उपलब्ध असलेल्या यापूर्वीच्या कोणत्याही ग्रंथांत आढळत नाही. यावरून भोजाच्या वेळींच हा संस्कार कल्पिला असेल असे वाटते. त्याने आपल्या पदरी ज्योतिषी बाळगून त्यांच्याकडून काही वर्षे वेध करवून त्या वेळेस ब्रह्म

  • डे. का. संग्रहांत वरुणकृत टीकेची नं. ५२६ व ५२७ सन १८७५/७६ ची अशी दोन पुस्तकें आहेत. यांतील पहिल्यांवून हा श्लोक घेतला आहे.