पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/237

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(११७) ग्रंथ. श्रीपति. ह्याचे सिद्धांतशेखर आणि धीकोटिदकरण असे दोन ज्योतिषगणितग्रंथ आहे त, रत्नमाला ह्मणून मुहूर्तग्रंथ आहे आणि जातकपद्धति ह्मणून जातकग्रंथ आहे. सिद्धांतशेखर हा ग्रंथ माझ्या पहाण्यांत आला नाही. डे. का. सरकारी पुस्तकसंग्रह, पुणे आनंदाश्रमांतील पुस्तकसंग्रह, इत्यादि बन्याच संग्रहांच्या यादीतही त्याचे नांव कोठे आढळलें नाहीं; परंतु भास्कराचार्याने त्याचा उल्लेख केला आहे. तसेच ज्योतिषदर्पण (शक १४७९) नामक मुहूर्तग्रंथ आणि सिद्धांतशिरोमणीची मरीचिनामक टीका यांत त्यांतील वचनें आहेत. धीकोटिदकरण सांप्रत मुळीच प्रसिद्ध नाही. परंतु त्यांतील चंद्रसूर्यग्रहणांची प्रकरणे मला पुणे आनंदाश्रमांत आढळली. त्यांचे फक्त १९ श्लोक आहेत. सांप्रत छापून प्रसिद्ध झालेल्या कोणत्याही पुस्तकांत श्रीपतीच्या कालाविषयी कांहीं पत्ता नाही. परंतु तो श्रीपतीचा काल वर लिहिलेल्या काल. लहानशा त्रुटितकरणांत मला आढळला.त्या करणांत गणितास आरंभवर्ष शक ९६१ आहे. यावरून याच सुमारास श्रीपति झाला. वरील दोन प्रकरणांवर लहानशी टीका आहे. तीत ग्रहणाची उदाहरणे २ करून टीका. दाखविली आहेत, त्यांत शक १५३२ व १५९३ ही दोन वर्षे आहेत. यावरून या कालापर्यंत तें करण कांहीं प्रांतांत प्रचारांत असावे असे दिसते. रत्नमाला आणि जातकपद्धति हे दोन्ही ग्रंथ काशी एथे छापले आहेत. दोहोंवर महादेवी ह्मणून टीका आहे. श्रीपतीने आपले स्थल, वंशवृत्त इत्यादि कांहीं सांगितले नाही. तथापि रत्नवंश. मालाटीकेच्या आरंभी महादेव म्हणतोः कश्यपवंशपुंडरीकखंडमार्तडः केशवस्य पौत्रःनागदेवस्य सूनुःश्रीपतिःसंहितार्थ अभिधातुमिच्छ:आह. यावरून याचे गोत्र काश्यप, याच्या आजाचें नांव केशव, आणि याच्या पित्याचें नांव नागदेव असे दिसून येते. रत्नमालाग्रंथ लल्लाच्या रत्नकोशाच्या आधारे केला असें श्रीपति ह्मणतो. धीकोटिदकरणावरूनही तो लल्लाचा ह्मणजे आर्यपक्षाचा आधार. अनुयायी दिसतो. वरुण. ब्रह्मगुप्ताच्या खंडखायावर याची टीका आहे. तींत उदाहरणांत मुरव्य शक ९६२ आहे. यावरून ह्याचा काल सुमारे तोच असावा. तो काश्मिकाल. स्थल. राजवळच्या उरुषा देशांतील चारय्याट अशासारख्या नां वाच्या गांवचा राहणारा होता असें टीकेवरून दिसते. त्याच्या स्थलाचे अक्षांश ३४।२२ व उज्जनि याम्योत्त रेषेपासून पूर्व देशांतर ९९ योजनें (झणजे सुमारे ७॥ अंश अथवा ४५० मैल) असें त्याने सांगितले आहे. खंडखायावरील याच्या टीकेंत एक चमत्कार आढळला, त्या टीकेंत प्रथमच अहर्गणसाधनांत असें झटलें आहे: