पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/228

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१२८) पहिल्या आर्यभटानंतर झाला हे उघड आहे. त्याचा काल ठरविण्यास काही प्रमाणे सांपडतात. वरील बीजसंस्काराचा श्लोक आर्यभटटीकाकार परमादीश्वर याने आपल्या टीकेत दिला आहे. तेथे “ तच्छिष्यो लल्लाचार्यः" ह्मणजे आर्यभटाचा शिष्य लल्ल अमें परमादीश्वराने म्हटले आहे. यावरून, व मुख्यतः बीजसंस्काराच्या रीतींत "शकांत ४२० वजा करावे" असे म्हटले आहे यावरून, लल्लाचा काल शके ४२० च असावा असें डा० केन म्हणतो. कै० वा० जनार्दन बाळाजी मोडकही तसेंच म्हणतात ( सृष्टिज्ञान मासिकपुस्तक आगष्ट १८८५ चा अंक पृष्ट १२०). आणखीही कोणी तसेंच म्हणत असतील, परंतु ते म्हणणे चुकीचे आहे. कारण एक तर लल्ल हा प्रथमायंभटाचा शिष्य आणि त्याचा समकालीन असता तर भास्कराचार्याने लल्लाचे जे दोष दाखविले आहेत तशा चुका क्षुल्लक गोष्टींत तो करताना. प्रथमार्यभटाच्या ग्रंथांत ते दोष नाहींत. दुसरें असें की शके ४२० हा जर लल्लाचा काल असता तर प्रथमार्यभटाच्या ग्रंथावर, त्यांत फारसे दोष नसतांही, ब्रह्मगुप्ताने दूषणांची वृष्टि केली आहे, तर खरोखरच ज्या लल्लाच्या ग्रंथांत दोष आहेत त्यावर ब्रह्मगुप्तानें कहर करून सोडला असता. परंतु ब्रह्मसिद्धांतांत लल्लाचें नांव किंवा त्याचे कोणतेही मत नाही. तिसरें, कोणत्याही सिद्धांतास बीजसंस्कार उत्पन्न होतो तो त्याच काली उत्पन्न होत नाही. त्यावरून येणाऱ्या ग्रहांत जेव्हां बरेंच अंतर पडू लागते तेव्हां बीजसंस्कार कोणी तरी देतो. आर्यभटाचा ग्रंथ शके ४२१ मध्ये झाला आणि तेव्हांपासूनच त्याच्या शिष्याने त्यांत फेरफार केला हे अगदीं संभवत नाही. तसे असते तर स्वतः आर्यभटानेच तो संस्कार हिशेबांत घेऊन भगण दिले असते. लल्लाचा संस्कार काढण्याच्या रीतीत शकांत ४२० वजा करावे असे आहे. एवढ्यावरून तो संस्कार त्याच वेळी दिला असें होत नाही. ब्रह्मसिद्धांतास बीजसंस्कार दिला आहे, तो कलियुगारंभापासून आहे. तसाच सांप्रतच्या सूर्यसिद्धांतासही कलियुगारंभापासून आहे. परंतु यावरून तो संस्कार कलियुगारंभीच वस्तुतः उत्पन्न झाला हे म्हणणे हास्यास्पद आहे. तसेंच लल्लोक्त संस्कार ४२० मध्येच उत्पन्न झाला हे म्हणणे आहे. आणखी एक प्रमाण यांत घालतां येईल. ते असेंः मिथ्याज्ञानाध्यायांत लल्ल म्हणतो: यदि च भ्रमति क्षमा तदा स्वकुलायं कथमाप्नुयुः खगाः ॥ ४२ ॥ यांत पृथ्वी फिरते असें ह्मणणारास लल्लानें दोष दिला आहे. परंतु प्रथमार्यभट मात्र पृथ्वी फिरते म्हणतो, तेव्हां त्याचा साक्षात् शिष्य त्याच्या विरुद्ध मताचा असेल, निदान तो त्यास दोष देईल, असें बहुधा संभवत नाही. एकंदरीत पाहता लल्ल पहिल्या आर्यभटाचा शिष्य असणे अगदी संभवत नाही. भास्कराचार्याच्या ग्रंथांत पुष्कळ वेळा लल्लाचें नांव आले आहे, परंतु त्याने त्यास कोठेच आर्यभटशिष्य किंवा नुस्तें “शिष्य" असेही म्हटले नाही. सूर्यसिद्धांतटीकाकार रंगनाथ याने "शिष्यधीवृद्धिदतंत्र " असें एकदां म्हटले आहे. त्याचा अर्थ शिष्यांच्या धीचें वृद्धिद एवढाच आहे. लल्लास परमादीश्वराने आर्यभटाचा शिष्य कोणत्या आधाराने मटले नकळे. स्वतः लल्लाचे वरील श्लोक