पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/227

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(२१७) शल्य दिसून येते. वेधादिकांची यंत्रे यानें वर्णिली आहेत, त्यांतलें तुरीययंत्र याने नवीन कल्पिलें असें माझें मत आहे. बीजगणित याच्या पूर्वीच्या ग्रंथांत कोठे आढळत नाही. यावरून त्याचा उत्पादक कदाचित् हाच असेल. सिद्धांतसुंदरग्रंथाचा का ज्ञानराज याचा पुत्र सूर्यदास ह्याने भास्कराचार्याच्या बीजावर टीका शके १४६० मध्ये केली आहे. आर्यभट हा सर्वांत प्राचीन बीजगणितकार असें तो मानतो. पहिल्या आर्यभटाच्या ग्रंथांत बीजगणित नाही म्हटले तरी चालेल. दुसन्या आर्यभटग्रंथांत आहे. परंतु तो ब्रह्मगुप्ताहून अर्वाचीन आहे असें पुढें दाखविण्यांत येईल. तेव्हां प्रस्तुत उपलब्ध असलेल्या माहितीवरून पाहतां पहिला बीजगणितकार ब्रह्मगुप्तच होय. त्याने बीजगणिताध्यायांत तो विषय नवीन मी काढिला अशा प्रकारचे अभिमानाचे कांहींच उद्गार काढले नाहीत. यावरून त्याच्या पूर्वीही तो विषय असावा असें अनुमान होते. तथापि ग्रंथ उपलब्ध नाहींत. एकंदरीत पाहतां ब्रह्मगुप्त हा महाकल्पक आणि शोधक होय. भास्कराचार्यासारख्याने त्यास "कृती जयति जिष्णुजो गणचकचूडामणिः" असे म्हटले आहे. तसेंच दुसरे एके स्थली “यदा पुनर्महताकालेन महदंतरं भविष्यति तदा महामतिमंतो ब्रह्मगुतसमानधर्मिण एवोत्पत्स्यंते ते तदुपलब्ध्यनुसारिणी गतिमुरहित्य शास्त्राणि करिष्यंति" यांत स्वतःच्या शोधाने नवीन गतिस्थिति कल्पिणारा महामतिमान् शास्त्रकार असें त्यास मटलें आहे ते योग्य आहे. लल्ल ( सुमारें शक ५६०). ह्याचा धीवृद्धिदतंत्र या नांवाचा ग्रहगणितग्रंथ आहे. तो काशी एथे सुधाकर ग्रंथ. द्विवेदी यांणी इ० स० १८८६ मध्ये शोधून छापिला आहे. रत्नकोश नांवाचा याचा एक मुहूर्तग्रंथ आहे. लल्लाने आपला काल किंवा स्थल सांगितलें नाहीं. धीवृद्धिदतंत्रांत मध्यमाधि कारांत तो ह्मणतो:विज्ञाय शास्त्रमलमार्यभटप्रणीतं । तंत्राणि यद्यपि कृतानि तदीयशिष्यैः ।। कर्मक्रमो न खलु सम्यगुदीरितस्तैः । कर्म ब्राम्यहमतः क्रमशस्त सूक्तं ॥ २ ॥ उत्तराधिकारांत आर्यसिद्धांतावरून येणान्या ग्रहांस बीजसंस्कार सांगितला आहे, तो असाः शाके नखाब्धि ४२० रहिते शशिनोक्षदस्तै २५ स्तत्तुंगतः कृतशिवै ११४ स्तमसः षडंकैः ९६॥ शैलाब्धिभिः ४७ सुरगुरोर्गणिते सितोचात् शोध्यं त्रिपंचकु १५३ हतेभ्रशराक्षि २५० भक्त ॥ १८ ॥ स्तंबेरमांबुधि ४८ हते क्षितिनंदनस्य सूर्यात्मजस्य गुणितेंबरलोचनै २० श्च ॥ व्योमाक्षिवेद ४२० निहते विदधीत लब्धं शीतांशसूनुचलतुंगकलासवृद्धि ॥ १९ ।। इति...ग्रहकर्म दृक्प्रभावात् ।। २०॥ आसीदशेषबुधवंदितपादपद्मः ......॥ शाम्बस्ततोजनि जनेक्षणकैरवेंदुर्भट्टत्रिविक्रम इति प्रथितः पृथिव्यां ॥ २१ ॥ लल्लेन तस्य तनयेन शशांकमौलेः शैलाधिराजतनयादयितस्य शंभोः ।। संपूज्य पादयगमार्यभटाभिधानसिद्धांततुल्यफलमेतदकारि तंत्रं ॥ २२ ॥' लल्लाच्या ग्रंथांतील भगणादि माने सर्व पहिल्या आर्यभटाच्या ग्रंथाशी मिळतात. त्यांत लल्लाने वरील १८।१९ श्लोकांतला बीजसंस्कार मात्र दिला आहे. यावरून तो काल.