पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/217

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(२१७) शके ५५० मध्ये ब्रह्मसिद्धांत केला तेव्हां ब्रह्मगुप्त ३० वर्षांचा होता. यावरून त्याच जन्म शके ५२० मध्ये झालें. ब्रह्मगुप्त हा भिनमाळ येथील राहणारा होता. हे गांव अबूपर्वत आणि लणा नदी यांच्यामध्ये अबूच्या वायव्येस ४० मैलांवर गुजराथच्या उत्तरहद्दीवर दक्षिण मारवाडांत आहे. हल्ली ते लहान सें खेडं आहे. पूर्वी त्याचे नांव भीलमाल किंवा श्रीमाल असें होते. ती मावकवीची जन्मभूमि होय. हुएनसंग नांवाचा चिनी प्रवासी इ. स. च्या सातव्या शतकांत या देशांत आला होता त्या वेळी ती उत्तर गुर्जर देशाची राजधानी होती. ब्रह्मगुप्ताने आपला सिद्धांत चाप वंशांतील व्याघ्रमुखराजाच्या वेळी रचिला. व तो आपणास 'भिल्लमालकाचार्य ' असें म्हणवितो. चौडे अथवा चापोत्कट वंशांतले राजे इ. स. ७५६ पासून ९४१ पर्यंत अन्हिलवाड एथे राज्य करीत होते. व हल्लीही उत्तर गुजराथेंत लहान लहान संस्थाने त्यांजकडे आहेत. हा चावडे वंश व ब्रह्मगुप्ताने लिहिलेला चापवंश एकच असावा. हुएनसंगानें गुजराथची राजधानी भिलमाल असें ब्रह्मगुप्ताच्या कालाच्या सुमारासच लिहिले आहे. व ब्रह्मगुप्त हा भिलमाळचा राहणारा अशी कथा अजून गुजराथी ज्योतिषांत आहे. यावरून ब्रह्मगुप्त हा भिनमाळ येथील राहणारा असावा. ब्राह्मस्फुटसिद्धांत आणि खंडखायनामक करण हे याचे दोन ग्रंथ प्रसिद्ध आ हेत. खंडखाद्यांत आरंभवर्ष शके ५८७ हे आहे, यावरून ग्रंथ. आपल्या वयाच्या ६७ व्या वर्षी त्याने तो ग्रंथ केला. ब्रह्मसिद्धांतांत तो म्हणतोगणितेन फलं सिद्धं ब्राह्मे ध्यानग्रहे यतोध्याये ॥ध्यानग्रहो द्विसप्तत्यार्याणां न लिखितोत्र मया ।। अध्या. २४. यावरून ध्यानग्रह नामक ७२ आयींचा एक अध्याय याने केला होता आणि त्यांत फलें लिहिलेली होती असे दिसते. तो अध्याय सिद्धांतांत लिहिला नाहीं अमें तो ह्मणतो, आणि सांप्रत तो स्वतंत्रपणे उपलब्ध नाही. मग त्यांत जातकसंबंधे फलें होती की संहिताग्रंथांतल्यासारखी होती हे नकळे. परंतु तो फार महत्वाचा आणि गुप्तरीतीने शिष्यांस सांगण्यासारखा होता असा वरील आयत त्याचा आभप्राय दिसतो. ब्रह्मोक्त ग्रहगणित फार काल लोटल्यामुळे खिल झाले ह्मणून ते स्फुट ( स्पष्ट ) सांगतों अशा अर्थाची याची एक आर्या पूर्वी दिली आहे इतर ब्राम्हासद्धांत. (पृ०१५२).शाकल्योक्त ब्रह्मसिद्धांत या नांवाचा ब्रह्मदेवाने नारदास सांगितलेला एक सिद्धांत प्रसिद्ध आहे. परंतु तो शके ७४३ च्या पूर्वी झाला नव्हता असें वर ( पृ० १८९) दाखविलच आहे. आणि ब्रह्मगुप्ताने दिलेली भगणादि मानें इत्यादि कोणत्याच गोष्टींत त्याचे ब्रम्हगुप्तसि मिल्लमालकाचार्य' अशासारखी कांहीं संज्ञा खंडखायटीकाकार वरुण ह्याने त्यास हि ला आहे, व ती कांहीं लेखी पुस्तकांत शेवटी आढळते. † Indian Antiquary, XVII, p. 192. July 1888. २८