पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/174

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१७) डे. का. सं. प्रतींतील श्लोक प्रक्षित दिसतो. म्हणूनच वसिष्टसिद्धांताची भगणादि माने इतर सिद्धांत प्रमाणेच वर दिली आहेत. U या पांच सिद्धांतांच्या कालाचा सामान्यतः थोडासा विचार काल. करू. बेंटली याने ज्योतिषसिद्धांतरचना काढण्याची एक रीति काढली आहे. आणि तिजवरून त्याने सांप्रतच्या सूर्यसिद्धांताचा काल इ. स. १०९१ म्हणजे शके १०१३ हा ठरविला आहे. ती रीति अशी : ज्या सिद्धांताचा काल काढावयाचा त्यावरून निघणारी सूर्यसंबंधाने मध्यमग्रहस्थिति आणि आधुनिक युरोपियन ग्रंथांवरून निघणारी सूर्यसंबंधाने मध्यमग्रहस्थिति यांची तुलना करून इष्टसिद्धांताची ग्रहस्थिति केव्हां शुद्ध येते हे प्रत्येक ग्रहाचे पहावयाचे. आणि त्यांच्या सरासरीने त्या सिद्धांताचा काल ठरवावयाचा. सरुद्दर्शनी ही रीति बरोबर दिसते, आणि बेंटलीने ज्या गोष्टी गृहीत धरल्या आहेत त्या घेतल्या असतां तींत कांहीं चूक नाही. परंतु सर्व दिशांनी विचार करितां ती रीति लागू करणे चुकीचे आहे. अर्थात तीप्रमाणे काढलेले काल विश्वसनीय होणार नाहीत. याची कारणे अशी:-बेंटलीची मोठी चुकी ही की त्याने हिंदुग्रंथावरून निघणारे आणि युरोपियन शुद्धकोष्टकांवरून निघणारे मध्यम ग्रह यांची तुलना केली आहे. परंतु आकाशांत मध्यम ग्रह दिसत नाहीत. म्हणजे त्यांचे जे मध्यमभोग येतात त्यांप्रमाणे ग्रह दिसावयाचे नाहीत; त्यांच्या स्पष्टभोगाप्रमाणे ते दिसतात. आणि भारतीय ज्योतिषांनी जेव्हा जेव्हां आपले मूलग्रंथ रचले किंवा मूलग्रंथाप्रमाणे ग्रह अनुभवास येतना अशा ज्या ज्या काली मूलग्रंथांस बीजसंस्कार देऊन ते स्वकालच्यासंबंधें शुद्ध केले. तेव्हां तेव्हां त्यांनी वेधावरून म्हणजे आकाशांत स्पष्टग्रह त्यांस दिसले त्यांवरून तसे केले असले पाहिजे. मध्यमग्रह आणि स्पष्टग्रह यांत में अंतर त्यास सामान्यतः फलसंस्कार असें नांव दिले असतां चालेल. ह्या फलसंस्काराचे मान आणि तो देण्याची रीति ह्या दोन गोष्टी युरोपियन ग्रंथ आणि भारतीय ग्रंथ यांच्या एकच असतील तर मध्यमग्रहांची तुलना करून ग्रंथाचा काल काढण्यास हरकत नाही. परंतु तसें नाहीं. सूर्याचा फलसंस्कार कोणत्याही भारतीय ग्रंथाप्रमाणे २ अंश १० कला यांहून कमी नाहीं; आणि युरोपियन ग्रंथाप्रमाणे सांप्रत तो सुमारें १ अंश ५५ कला आहे. आणि हा संस्कारही नेहमी सारखा नसतो. शकापूर्वी ३००० वर्षे या कालीं तो २ अंश १० कला होता, उत्तरोत्तर की होत आहे, असें युरोपियन ग्रंथकार सिद्ध करितात. चंद्राचा फलसंस्कार हिंदुग्रंथांप्रमाणे सुमारे ५ अंश आहे. युरोपियन ग्रंथांप्रमाणे कधी कधीं तो ८ अंश असतो. हिंदूंनी मानलेला फलसंस्कार फार चुकतो. याप्रमाणे इतर ग्रहांच्या फलसंस्काराची मानेही थोडथोडी भिन्न आहेत. तसेंच मध्यमग्रहावरून स्पष्टग्रह काढण्याची रीति आणि तिची मंदशीघ्रोच्चादि उपकरणे हीही दोहोंची किंचित् भिन्न आहेत. येणेकरून भारतीय ग्रंथ आणि युरोपियन ग्रंथ यांचे मध्यमग्रह सारखे असले, तरी त्यांवरून काढलेले दोहोंचे स्पष्टग्रह सारखे येतीलच असा नियम नाहीं. किंवा दोहोंचे स्पष्टग्रह सारखे असले तरी त्यांवरून काढलेले दोहोंचे मध्यमग्रह सारखे येतील असें नाही. तसेंच त्या दोहोंमध्ये जें अंतर पडेल तें सर्वकाल एका नियमानें