पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/173

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१७१) युगारंभापर्यंत ४५६७ कलिप्रमाण वर्षे गेली. ही संख्या २।। यांनी विभाज्य नाही. यामुळे सृष्टयुत्पत्तीकडे काही वर्षे गेली असे मानले नाही, तर कल्पारंभी सर्व ग्रह एकत्र येत नाहीत. कलिप्रमाण ३९३ युगे सृष्टयुत्पत्तीकडे गेल्यामुळे ग्रहप्रचारारंभापासून वर्तमानकलियुगारंभापर्यंत (४५६७ - ३९॥) ४५२७। कलिप्रमाण युगें होतात. ही संख्या २।। यांनी विभाज्य आहे. यामुळे सृष्टयारंभी सर्व ग्रह एकत्र होते असे मानून वर्तमानकलियुगारंभी आणि तत्पूर्वकृतांतीं ते एकत्र येतात. तसेच ग्रहांची उच्चे आणि पात यांचे भगणांची संख्या कल्पांत जी मानली आहे तिर्ने सृष्टयारंभी मात्र उच्चे आणि पात एकत्र होते; बाकी कोणत्याही काली ते सर्व एकत्र येत नाहीत. ' या पांच सिद्धांतांपैकी सूर्यसिद्धांत फार प्रसिद्ध आहे. त्यावर निरनिराळ्या टी का झालेल्या आहेत: आणि सांप्रत तो छापलेलाही सामान्य वर्णन आहे. बाकीचे चार सिद्धांत फारसे प्रसिद्ध नाहींत. त्यांपैकी ४ अध्यायांचा ९४ श्लोकांचा एक वसिष्ठासद्धांत काशी एथें विंध्येश्वरीप्रसादशर्मा यांनी छापला आहे. बाकी कोणताही छापलेला माझ्या पहाण्यांत नाही. ह्या चारही सिद्धांतांची पुस्तकें मी मोठ्या प्रयत्नानें मिळविली आहेत. काशी एथे छापलेल्या वासष्ठासद्धांताहून शब्दरचनेनं मात्र भिन्न असें वसिष्ठसिद्धांत भूगोलाध्याय म्हणून एक पुस्तक डेकनकालेजसंग्रहांत आहे. (नंबर ७८ सन १८६९/७०). त्याचे २ अध्याय आहेत. त्यांचे एकंदर श्लोक १३३ आहेत. यांत पहिल्या अध्यायांत १२१ श्लोकांत सृष्टिसंस्थावर्णन इतर सिद्धांतांप्रमाणे आहे. दुसन्या अध्यायांत ग्रहांची कक्षामाने मात्र आहेत. या दोन प्रकारच्या वसिष्ठसिद्धांतांतली भगणादि मानें अगदी सारखी आहेत. म्हणून वसिष्टसिद्धांत दोन न म्हणतां एकच म्हणणे बरे. याविषयी थोडे जास्त विवेचन पुढे येईल. वरील पांचही सिद्धांतांतली भगणादि मानें सारखी आहेत असें वर म्हटलें खरें परंतु थोडा भिन्न प्रकार आढळला तो सांगितला पाहिजे. छापलेल्या वसिष्ठसिद्धांताचीच एक लेखी प्रत डेक्कनकालेजसंग्रहांत आहे (नंबर ३६ सन १८७०।७१), तींत पहिल्या अध्यायांत खालील श्लोक आढळला : नृपेषु सप्तवन्ह्य ("श्वि?) यमेभेषुधरोन्मिताः (१५८२२३७५१६)॥ भभ्रमाः पश्चिमायां च दिशि स्युर्वै महायुगे ।। १७ ॥ ह्या श्लोकांत नक्षत्रभ्रम दिले आहेत, त्यांवरून महायुगाचे सावन दिवस १५७७९१७५१६ होतात. म्हणजे वर्षाचे मान ३६५ दि. १५ घ. ३१ प. १५ वि. प. ४८ प्रतिविपळे इतके होते. हे इतर सर्व सिद्धांतांहून भिन्न आहे. परंतु काशी एथे छापलेल्या पुस्तकांत हा श्लोक नाहीं. वसिष्ठसिद्धांताची दुसऱ्या प्रकारची प्रत वर सांगितली (डे. का. सं. नंबर ७८ सन १८६९।७० ) तींतही नक्षत्रभ्रम मुळींच दिलेले नाहीत. आणखी असें की सिद्धांततत्त्वविवेककार कमलाकर (शके १५८०) याने सूर्यसिद्धांताशीं ज्यांचे सर्वांशी साम्य आहे असे जे सिद्धांत सांगितले आहेत, त्यांत हाच वसिष्ठसिद्धांतही आहे. यावरून

  • सदर प्रतींत आठवें अक्षर नाही. परंतु त्या स्थानी २ या अर्थाचे काही तरी अक्षर पाहिजे. म्हणून “श्चि"हे अक्षर मी घातले आहे.

भगणमानाध्याय श्लोक ६५.