पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/168

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१६६) युगपद्धति आहे हे सिद्ध होते. पुढे दिलेले ग्रहभगण आणि मध्यरात्रीस युगारंभ घेऊन पडणारा त्यांच्या क्षेपकांशी मेळ यावरूनही ह्या गोष्टी सिद्ध होतात. वरील आर्यांवरून निघणारी मानें अशीः दि. घ. प. विपळे. वर्षमान ३६५ १५ ३० ३० महायुगांत (४३२०००० वर्षांत ) नक्षत्रभ्रम १५८२२३७८०० गुरु ३६४२२० रविभगण ४३२०००० शुक्र ७०२२३८८ सावनांदिवस १५७७९१७८०० शनि १४६५६४ चंद्रभगण ५७७५३३३६ | सौरमास ५१८४०००० चंद्रोच्चभगण ४८८२१९ अधिमास १५९३३३६ राहु चांद्रमास ५३४३३३३६ मंगळ २२९६८२४ | तिथि: १६०३०००००० बुध १७९३७०००क्षयाह २५०८२२८० वरील आर्यांवरून निघणारे क्षेपक (पंचसिद्धांतिकोक्त सूर्यसिद्धांतावरून निघणारी करणारंभकालीन ग्रहस्थिति) रा. अं. क. विकला. रवि ११ २९ २७ २० हे क्षेपक शकगतवर्ष ४२७ चैत्र कृष्ण चंद्र ११ २० ११ १६१४ रविवार मध्यान्हींचे आहेत. चंद्रोच्च ९ ९ ४४ ५३ ) राहु मंगळ २१५ भौमादि सर्व ग्रहक्षेपक चैत्र कृष्ण बुध ४२८ १७ १४ रविवार मध्यरात्रींचे आहेत. गुरु ०८ ६ २० शुक्र ८२७ ३० ३५ शनि ४ २ २८४९

  • गुरुवार मध्यरात्रीं युगारंभ मानून गतिस्थितीशी प्रथम मेळ घालणे आणि तो मेळ पडतो यावरून गृहीत गोष्ट खरी असे सिद्ध करणे यांत अन्योन्याश्रय आहे. परंतु ज्याविषयी प्रथम काही निश्चितपणे ठाउक नाही अशा पुष्कळ गोष्टींविषयीं ज्योतिषगणितांत असेंच करावे लागते. वरील आर्यातील सर्व गोष्टींचा विचार करून त्यांची फलें सिद्ध झालेली वर दिली आहेत. परंतु ती सिद्ध करण्यास मला किती श्रम पडले, किती विचार करावा लागला, किती भिन्न भिन्न प्रकारांनी व निरनिराळ्या गोष्टी गृहीत मानून प्रत्यंतरें पहावी लागली, हे यांतील माहितगारास मात्र समजेल. १४०० वर्षांपूर्वीचा पंचसिद्धांतिका ग्रंथ, त्यावर टीका नाहीं, मिळालेले पुस्तक अति अशुद्ध, वर लिहिलेल्या आर्यांत जागोजाग ज्या शब्दांखालीं तद्बोधित अंक घातले आहेत त्या शब्दांच्या खरेपणाविषयीं पुस्तकाच्या अशुद्धतेमुळे प्रत्येक स्थली संशय, आणि यांतील वर्षमान आणि ग्रहभगण सांप्रत चालणाऱ्या कोणत्याच सिद्धांताशी सर्वांशी जमत नाहींत, इतक्या अडचणी असतां (आगष्ट १८८७ व फेब्रुआरी १८८८ मध्ये) गणित करून गणकभाजकांचा आणि क्षेपकांचा मेळ बसला, आणि विशेषतः भास्वतीकरण आणि खंडखाद्य यांतील ग्रहस्थिात पंचसिद्धांतिकोक्त सयंसिद्धांताशी बहुतांशी मिळाली आणि तेणेकरून तिहींविषयी निश्चितपणा झाला, तेव्हां मला जो आनंद झाला तो सांगता येत नाही. तथापि या शोधास इतिहासदृष्टया कांहीं महत्व असेल त्यापेक्षा यांत विशेष कांहीं नाहीं हेही एथे सांगितले पाहिजे. हा ग्रंथ लिहीत असता असे आनंदाचे प्रसंग आणखीही काही आले.