पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/167

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१६५) यांचे भगण, करणकालींचे क्षेपक, इत्यादि ज्यांत दिले आहे त्या आर्या प्रथम देऊन त्यांवरून निघणारी माने पुढे देतो. * वर्षायुते धृतिने १८०००० नव वसुगणरसरसाः ६६३८९ स्थरधिमासाः॥ सावित्रे शरनवखेंद्रियाणवाशा १०४५०९५ स्तिथिप्रलयाः ॥ २४ ॥ युगणेोष्टशत ८०० ने विपक्षवेदार्णवे ४४२ कसिद्धांते ॥ स्वरखाश्विद्विनवयमो २९२२०७ द्धते क्रमादिनदलेऽवंत्यां ॥ २ ॥ नवशतसहस्र ९००००० गुणिते स्वरैकपक्षांबरस्वरर्तृ ६७०२१७ ने ॥ षड्ब्योमेंद्रियनववसविषयजिनै २४५८९९९६ र्भाजिते चंद्रः॥ २ ॥ नवशत ९०० गुणिते दद्याद्रसविषयगुणांबरर्तुयमपक्षान् २२६०३५३ ॥ नववसुसप्ताष्टांबरनवाश्वि २९०८७८९ भक्ते शशांकोचं ॥ ३ ॥ शशिविषय ५१ मानींदोः खार्काग्नि ३१२० हतानि मंडलानि ऋणं ॥ स्वोचे दि १० ग्नानि धनं स्वरदत्रयमो २२७ ते विकलाः ॥ ४ ॥ अध्याय ९. एष निशाधैवंत्यां ताराग्रहणेर्कसिद्धांते ।। तदुपुत्रशुक्रो तुल्यगतौ मध्यमार्केण ॥१॥ जीवस्य शता १०० भ्यस्तं द्वित्रियमाग्नित्रिसागरै ४३३२३२ विभजेत् ॥ युगणं कुजस्य चंद्रा १ हतं तु सप्ताष्टषड् ६८७ भक्तं ॥ २ ॥ सौरस्य सहस्त्र २००० गुणं ऋतरसशून्यर्तुषट्कमुनिखेकैः १०७६६०६६ ॥ यल्लब्धं ते भगणाः शेषा मध्याग्रहाः क्रमेणैव ॥३॥ राशिचतुष्टय ४ मंशद्वयं २ कलाविंशतिर्वसुसमेताः २८॥ नववेदा ४९ अ विलिप्ताः शनेर्धन मध्यमस्यैवं ॥ ५ ॥ अष्टौ ८ भागालिप्तर्तवः ६ खमक्षी २० गुरौ विलिप्ताश्च ।। क्षेपः कुजस्य यम २ तिथि १५ पंचत्रिंशच ३५ राश्यायः ॥ ६ ॥ शत १०० गुणितं बुधशीघ्र स्वरनवसप्ताष्टभाजिते ८७९७ क्रमशः॥ अत्रार्धपंचमा ४।३० स्तत्पराश्च भगणाहताः क्षेप्याः ॥ ७ ॥ सितशीघ्रं दश २० गुणिते युगणे भक्ते स्वरार्णवाश्वियमैः २२४७ ।। अर्धकादश देया विलिप्तिका भगणसंगुणिताः ॥ ८ ॥ सिंहस्य वस्यमांशाः २८ स्वरेंदवो १७ लिप्तिका ज्ञशीघ्रधनं ।। शोध्याः सितस्य विकलाः शशिरसनवपक्षगुणदहनाः ३३२९६१ ॥९॥ अध्याय १६. यांतील पहिल्या दोन आर्यांवरून वर्षाचें मान ३६५ दि. १५ घ. ३१ प. ३० विपळे येते. हे वर्षमान घेऊन आणि कलियुगारंभ गुरुवारी मध्यरात्री झाला (ह्मणजे त्या वेळी रविचंद्रांचे भोग पूर्ण होते ) असें मानून शके ४२७ या वर्षी मध्यम मेषसंक्रमण चैत्र कृष्ण १४ रविवारी घटी ४८ पळे ९ यावेळी येते. (ह्मणजे त्या वेळी मध्यम रवि ० होता) “युगणेऊ" या आर्येवरून रविक्षेपक ११ रा. २९ अं. २७ क. २० वि. येतो, आणि तो अवंतीदिनार्धकालींचा आहे, हे त्या आर्यंत स्पष्टच आहे. मात्र तो कोणत्या दिवशींचा हे सांगितले नाही. चैत्र कृष्ण १४ रविवारी मध्यान्हीचा, त्या दिवशी झालेल्या मध्यम मेषसंक्रमापूर्वी ३३ घ.९ प. या वेळचा मध्यम रवि काढून पाहतां तो क्षेपकाशी पूर्णपणे मिळतो. यावरून पंचसिद्धांतिकोक्त सूर्यसिद्धांतांत युगारंभ मध्यरात्री मानला आहे, आणि त्यांत

  • पंचसिद्धांतिका मूळ प्रत फार अशुद्ध आहे. तींतल्या आर्या उपपत्नीवरून जशा असा असें निःसंशय दिसते तशा त्या शुद्ध करून मी एथे दिल्या आहेत.