पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/163

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

( १६१) ह्या आर्या आहेत. आणि त्या पुलिशसिद्धांतांतल्या म्हणून दिलेल्यापैकी आहेत. यावरून माने निघतात ती अशी: दि. घ. प. वर्षमान ३६५१५३० महायुगांत सावनदिवस १५७७९१६००० महायुगांत राहुभगण २३२२२७१५१४ १६५५ एका राहुभगणाचा काल ६७९४ दि.४१ घ. १८ प. यांतील वर्षमान इतर सिद्धांतांहून निराळे आहे. तसेंच राहुभगणकालही किंचित् भिन्न आहे. पुलिशसिद्धांतांतील इतर गोष्टी पंचसिद्धांतिकेंत दिल्या आहेत. त्यांत रविचंद्रांचे स्पष्टीकरण आहे. पलभेवरून चरखंडे आणि त्यांवरून दिनमान काढण्याचा प्रकार दिला आहे. देशांतराचा विचार आहे. तिथिनक्षत्रे काढण्याची रीति सांप्रतच्याप्रमाणेच आहे. करणे आहेत. रविचंद्रांचें क्रांतिसाम्य ह्मणजे महापात यांचा विचार आहे. ग्रहणांचा विचार आहे आणि तो बहुतेक सांप्रतच्या इतर सिद्धांताप्रमाणेच आहे. ग्रहवक्रमार्गित्वाचा विचार आहे; तो खंडखाद्य ग्रंथांतल्या पद्धतीप्रमाणे आहे. चरविचारांत पुढील आर्या आहे: यवनाच्चरजा नाड्यः सप्ता(७)वत्यात्रिभाग(संयुक्ताः॥ वाराणस्यां विकृतिः(९)साधनमन्यत्र वक्ष्यामि ॥ यांत अवती (उज्जयिनी) चे चर घटी ७ पळे २० आहे. आणि वाराणसीचे घटी ९ आहे. वेदांगज्योतिषांतल्याप्रमाणे दक्षिणायनांतीच्या दिनमानापेक्षां उदगयनांती जितकी दिनमानवृद्धि होते तीही दिलेली दिसते. सायनपंचांगांत उज्जयिनीचें परमाल्प दिनमान घ. २६ प. २६ आणि परमाधिक दिनमान घ. ३३ प. ३४ आहे. म्हणजे दोहोंचें अंतर ७ घ. ८ प. आहे. ग्रहलाघवावरून उज्जयिनीचें परमाल्प दिनमान घ. २६ प. २१ आणि परमाधिक दिनमान घ. ३३ प. ३९ येते. यांचे अंतर घ. ७ प. १८ आहे. उज्जयिनीची पलभा ५।८ धरून हे आहे. पंडित बापूदेव यांच्या पंचांगांत काशीचें परमाधिक दिनमान ३३।५६ आणि परमलघु दिनमान २६।४ आहे. म्हणजे दोहोंचें अंतर ७५२ आहे. हे काशीची पलभा ५।४० धरून आहे. हीच पलभा धरून ग्रहलाघवावरून दोहोंचें अंतर ८ घ.४ प. होते. पलभा ६१५ धरली तर पंचसिद्धांतिकेतील पुलिशचरखंडांवरून सुमारे ९ घटिका अंतर येते. पोलिशसिद्धांतावर लाटदेवाची व्याख्या आहे, असें पंचसिद्धांतिकेच्या तिसया आर्येत सांगितले आहे. कोणत्याही प्रकारचा पुलिशसिद्धांत सांप्रत उपलब्ध असलेला माझ्या पाहण्यांत किंवा ऐकण्यांत आला नाही. बृहत्संहिताटीकेंत उत्पलाने एकंदर सुमारे २५ आर्या पुलिशसिद्धांतांतील ह्मणून कारणवशात् आधारास दिल्या आहेत. त्यांत पुलिशसिद्धांतांतील भगणमाने इत्यादि महत्वाच्या गोष्टी आल्या आहेत. ह्मणन त्या आर्या मी एके ठिकाणी लिहून काढलेल्या एथे देतोंः