पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/155

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१५५) युगमन्वंतरकल्पाः कालपरिच्छेदकाः स्मृतावक्ताः॥ यस्मान रोमके ते स्मृतिबाटो रोमकस्तस्मात् ।। १३ ।। अध्याय १. अथ-युगें, मन्वंतरें, कल्प, हे स्मृतीत कालपरिच्छेदक सांगितले आहेत. ते कात नाहीत ह्मणून रोमक [ सिद्धांत ] स्मृतिबाह्य [ होय ]. दुसरे स्थलीं ब्रह्मगुप्त म्हणतोः लाटात्सूर्यशशांको मध्याविंटूचचंद्रपातौ च ॥ कुजबुधशाप्रबृहस्पतिसितशीघ्रशनैश्चरान् मध्यान् ।। ४८ ॥ युगयातवर्षभगणान् वासिष्ठान् विजयनंदिकृतपादान् ॥ मंदोचपरिधिपातस्पष्टीकरणाद्यमार्यभटात् ।। ४९ ।। श्रीषेणेन गृहीत्वा रत्नोचयरोमकः कृतः कंथा ॥ एतान्येव गृहीत्वा वासिष्ठो विष्णुचंद्रेण ॥५०॥ अध्याय ११. सारांश-लाटरुत ग्रंथांतून मध्यम रवि, चंद्र, चंद्रोच्च, चंद्रपात, मंगल, बुध, गुरु, शुक्र, शनि, वासिष्ठांतून युगयातवर्षे, भगण; विजयनंदित ग्रंथांतून पाद; आणि आयभटीयांतून मंदोच्च, परिधि, पात, स्पष्टीकरण; ही घेऊन श्रीषेण यानें रोमक ही एक कंथा केली आहे. तसेच ती माने घेऊन विष्णुचंद्राने वासिष्ठसिद्धांत केला आहे. यांत श्रीषेणाने जी माने दुसऱ्या ग्रंथांतून घेऊन रोमकसिद्धांत केला तीच घेऊन विष्णुचंद्रानें वासिष्ठसिद्धांत केला असें झटले आहे. आणि श्रीषेणाने युगयातवर्षे आणि भगण वासिष्ठावरून घेतले असें झटले आहे. यावरूनच विष्णुचंद्रानेही वसिष्ठसिद्धांतावरून युगयातादि घेऊन आणि इतर ग्रंथांतील दुसरें कांहीं घेऊन वसिष्ठसिद्धांत केला असें स्पष्ट झाले. यावरून ब्रह्मगुप्ताच्या वेळी वसिष्ठसिद्धांत दोन होते आणि ते दोन्ही त्यास माहीत होते असे सिद्ध होते. एक मूलवसिष्ठसिद्धांत आणि दुसरा त्यावरून कांहीं मूलतत्त्वे घेऊन विष्णुचंद्राने केलेला वसिष्ठसिद्धांत. रोमकसिद्धांतांत युगें, मन्वंतरे आणि कल्प हीं नाहींत ह्मणून तो स्मृतिबाह्य असें दूषण ब्रह्मगुप्ताने दिलें तें वर सांगितलेच आहे. परंतु श्रीषेणानें वसिष्ठसिद्धांतांतून युगयात घेऊन रोमकसिद्धांत केला असें तोच ह्मणतो हे वर दाखविलेच आहे. तसेंच तो आणखी ह्मणतो की:तयुगवधो महायुगमुक्तं श्रीषेणविष्णुचंद्राद्यैः ॥ अ० ११ आर्या ५५. मेषादितः प्रवृत्ता नार्यभटस्य स्फुटा युगस्यादौ ॥ श्रीषेणस्य कुजायाः अ० २ आ० ४६. यावरून श्रीषणकत रोमकसिद्धांतांत युगपद्धति आहे असें ब्रह्मगुप्ताच्याच ह्मणण्यावरून दिसून येते. यावरून ब्रह्मगुप्ताच्या वेळी रोमकसिद्धांत दोन होते, एक मूलरोमकसिद्धांत आणि दुसरा श्रीपेणकत. ब्रम्हगुप्ताच्या सिद्धांतांत तत्पूर्व ज्योतिष्यांची जी नांवें आली आहेत त्यांपैकी बहुतेक पंचसिद्धांतिकेंत आली आहेत. असे असून श्रीषेण आणि विष्णुचंद्र ही