पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/154

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१५४) फार उपयोग झाला असता. परंतु तो पितामहसिद्धांत आतां मूळरूपाने उपल ब्ध होण्याची आशा बहुधा करण्यास नको. वसिष्ठसिद्धांत. वसिष्ठसिद्धांतासंबंधे १३ आर्या पंचसिद्धांतिकेंत आहेत. त्यांत जी पद्धति आहे ती सांप्रतच्या सिद्धांतग्रंथपद्धतीहून कांहीं तरी निकाल. राळी आहे. यावरून, आणि वसिष्ठसिद्धांत दूरविभ्रष्ट अस वराहाने म्हटले आहे, यावरून पितामहखेरीज बाकी तीन सिद्धांतांहून तो प्राचीन असावा असें अनुमान होतें. तेरा आर्यावरून दिसते की त्यांत रविचंद्रांखेरीज दुसऱ्या ग्रहांविषयी काहा सांगितले नाही. तिथि आणि नक्षत्रे काढण्याची रीति पद्धति. सांगितली आहे, ती सांप्रतच्या पद्धतीप्रमाणे नाही. राश्यंशक ला ही मानें त्यांत आहेत, आणि छायेचा विचार बराच केला आहे. दिनमानाविषयीही काही सांगितले आहे, आणि लग्न हा शब्द सांप्रत सारख्याच. काही अर्थी आला आहे. सांप्रत उपलब्ध असलेला जो वसिष्ठसिद्धांत त्याचे वराहमिहिरापूर्वीच्या वसिष्ठसिद्धांताशी कांहीं साम्य नाही. सांप्रतचा वसिष्ठसिद्धांत वराहमिहिराच्या वेळी नव्हता. याविषयी जास्त विवेचन पुढे येईल. ब्रह्मगुप्ताच्या वेळी (शक ५५० ) वसिष्ठसिद्धांत दोन होते, आणि रोमक सि द्धांतही दोन होते. वसिष्ठसिद्धांत दोन होते याविषयी निरनिराळे वासिष्ठ विवेचन ज्या आधारे करावयाचे आहे, त्यांतच रोमक सिआणि रोमक सिद्धांत. द्धांताचा विचार सहज येणार आहे, ह्मणून त्या दोहोंबद्दल विचार एथेच करूं. ब्रह्मगुप्त आपल्या सिद्धांतांत एके स्थलीं ह्मणतो:पौलिशरोमकवासिष्ठसौरपैतामहेषु यत्प्रोक्तं ॥ तनक्षत्रानयनं नार्यभटोक्तं तदुन्तिरतः ॥ १६ ॥ अध्याय १४. अर्थ-पौलिश, रोमक, वासिष्ठ, सौर, पैतामह या [सिद्धांतां] त जे सांगितले आहे तें नक्षत्रानयन (नक्षत्र काढण्याची रीति ) आर्यभटाने सांगितले नाही ह्मणून ते सांगतों. दुसरे एके स्थली तो ह्मणतोःअयमेव कृतः सूर्येदपुलिशरोमकवसिष्ठयवनायैः ।। अध्या. २४ आर्या ३. हाच [ युगारंभ ] सूर्य, इंदु, पुलिश, रोमक, वसिष्ठ यवन यांनी केला आहे. या दोहों स्थली ब्रह्मगुप्ताने सूर्यादि सिद्धांतांचा आधार स्वतःस अनुकूल ह्मणन घेतला आहे. 'एकंदर ब्रह्मगुप्तसिद्धांत पाहिला असतां त्यानें आर्यभटादिकांवर दूषणांचा कसा तडाखा उडवून दिला आहे, हे दिसून येते. दूषणांची जशी काय त्यानें वृष्टि केली आहे. असे असून त्याणे सूर्यादि पांच सिद्धांतांपैकीं रोमक खेरीजकरून बाकी सिद्धांतांस प्रत्यक्ष दृषण कोठेच दिले नाही. रोमक सिद्धांतास तरी 'प्रत्यक्ष दूषण एकदाच दिले आहे. ते असे:--