पान:भरतपुरचा वेढा.pdf/4

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

११५१ प्रास्ताविक दोन शब्द. आमच्या भरतखंडांत, शौर्यधैर्यादि युद्धोपयोगी गुणांसंबंधानें जे लोक फार प्रसिद्ध आहेत, त्यांमध्ये राजपुतान्यांतील जाट लोकांचीही इतिहासकारांनी प्रमुखत्वाने गणना केलेली आहे. इसवी सनाच्या एकोणिसाव्या शतकांत, भरतपुरच्या जाट राजांशी इंग्रजांच्या ज्या लढाया झाल्या त्यांचा वृत्तांत फार मनोरंजक आहे. परंतु त्या संबंधाची विस्तृत माहिती ज्यांत दिलेली आहे, असे एकही पुस्तक मराठी भाषेत अद्याप झालेले नसल्यामुळे, काही इंग्रजी व हिंदी ग्रंथांच्या आधाराने, मी हे लहानसें पुस्तक लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. हा प्रयत्न कितपत सफल झाला आहे, हे ठरविण्याचे काम इतिहास प्रिय व इतिहासज्ञ गृहस्थांचे आहे; ते ते सहृदयपणाने बजावितील, अशी जी माझी आशा आहे, ती परमेश्वर पूर्ण करो. कोल्हापुर,....जगन्नाथ रघुनाथ आजगांवकर. ८-११-१९०४."