पान:भगवान श्रीकृष्ण अथवा श्रीकृष्णाचे नितांत रम्य चरित्र.pdf/९८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[८४ ]

लांबलाब सह इक्षुदंड, वारे मंडप साखर निंबोळ्याचे घोस पोसले, लाल दुरंग्य नारंग्या सारंग्या लटकति, द्राक्षांचे घड पिकले रसाळ, मधुप झोंबती, मुक्त लोंबती विठाबाइनें ठाणे सोडुनि ठाणवया लखलखित ठेविल्या.... नवरत्नाच्या चौरंगावरि श्रीरंगानें झुलत सुखप्रद विप्र बसविला, पीतांबर पडदणीस देउनि, खंबा- इति भर्जरि नेसवुनि ...घमघमघम कर्पूरवर्तिका, वाजंत्र्याचे बाजे वाजति, त्या फुलबाजा नळे हवाया,. .. मखरिं लोंबती घागरमाळा, घंटा घणघग, भवत्या भ॑वत्या फिरति बायका, अष्टनायका...... जडवाचिया खडावांत हळु पाय देउनी- क्षीरोदक परिधान करवुनी "त्यानंतर भोजनाचा थाट उडाला:- मांडुनि स्वस्तिक सुवर्णपाट, अडणीवर सोन्याचें ताट, भ॑वता फलशाखांचा थाट...आम्लरायतें, रुचिर आयतें, कोमळ अंगीं सगळी वांगी.. काथी ताथी साथी चरुसह चाकवत चुका, चवळी विवळी कवळ्या शेंगा, चिमकुरादल चिरुनि चांगली, चमचमीत फोडणी देउनि ...कोहळा काशीफळें काकडी, कमळकंद कोवळी काचरी, दूध भोपळे दिव्य दोडके, दाळ दिंड शेवाळ वाळके... कंदमूळ फल फूलपात्र तरु, लेशमात्र घृतपाचिक शाका, दुरडी भरुनी धिरडी भाजुक साजुक नाजुक राजसवाणें, कानवल्यासि मानवले, साखरपोळ्या धिवर घारगे, मोतीचूर जिलेबी दलिया, बारिक ओदन दे अनुमोदन. .. भात केशरी परमकूसरी.... मठ्ठा मिठ्ठा मटमटा बहु मधुर लापसी, लोणकडें थिजले गाईचें तूप मधुर... वाटीभर एकेक घरीचे सोळाहजार पदार्थ आले. " अशा रतिीने ते थाटदार भोजन उरकलें. नंतर " सहस्रनव गंगेरी पानें, विडा अर्पिला अति सन्मानें, कात रुक्मरंगेरी पार्ने, चिकणि सुपारी....मौक्तिक भाजुनि चुना अर्कनिभ वर्ख शर्करा संक्षालित.... " असा विडा सेवितांच “ कर्कगुरूसम गर्क सुदामा तर्करहित नृप अलर्क तैसा समाधिशयनीं शयन करावयास सुदाम्याला कृष्णानें नेलें. पंत म्हणतात, निजपर्यकी मृदु शयनावरि विप्राला यदुराय । निजवुनि परमादरें हळुहळू करें चुरी मग पाय | " केवढे हें सुदाम्याचें भाग्य! लक्ष्मीनें ज्याचे पाय चुरावेत तो प्रभु भक्ताचे पाय आपल्या कोमल हातानें चुरतो ! धन्य | गोपालकृष्णा ! आपल्या वत्सलतेला सीमा नाहीं ! आपण दनिदयाळ आह्वांत यांत तिळमात्र शंका नाहीं. दुसऱ्या दिवशी मित्रवियोग - आपला प्रियभक्त दूर जाणार म्हणून कृष्णांस गहिवर दाटून आला ! व त्यांच्या डोळ्यांतून खळखळ अश्रुधारा चालल्या. " पावित गेला दूर जगत्पति कंठ दाटला भारी । मित्रवियोगें प्रभुच्या वाहे नेत्रावासुनि वारी | माझें स्मरण असोंदे