पान:भगवान श्रीकृष्ण अथवा श्रीकृष्णाचे नितांत रम्य चरित्र.pdf/९७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[ ८३ ]

गरिबी श्रीमंती यांपैकी त्याला कांहींच नको आहे. कारण एक भाव नाहीं माझा | तरी पाल्हाळ तें " अर्से त्यांचे निक्षून सांगणे आहे. "भलतिया याती जन्मावें " मूर्ख जैसे का दगड " असावे, पण एक ईश्वराची भक्ती करावी म्हणजे सर्व सार्थक झाले. मग त्या भक्तीसाठी तुम्हांस लक्षावधि पुष्पहारांनी असंख्य दीपांच्या झगझगाटांत परमेश्वराची पूजा बांधतां आली नाही व षड्सांचें सुवर्णपात्र प्रभुपुढें ठेवतां आलें नाहीं तरी प्रभूस त्याची पर्वा नाहीं. उलट भावावांचून ती त्याला नकोशीं होतात व भावानें अर्पिलेली एखादी पोह्याची मूठच प्रभूला मज अमृताहूनि सुरसें । बोनी वोगरिली बहुवसें ! " अशी वाटते, सुदाम्यावे उदाहरण घेऊन प्रभूच अर्जुनास ज्ञानेश्वरमुखानें सांगतात :- " हें सांगावें काय किरीटी | तुवांचि देखिलें आपुलिया दिठीं । मी सुदामयाचिया सोडी गांठी । पव्हयासाठी "असो. प्रभूची भक्तवत्सलता वर्गावी तितकी थोडीच आहे.
 आतां वरील प्रसंगाचे वर्णन अमृतराय आपल्या ठेकेदार व शब्दचमत्कृतिमय कटावांत कसें करतात तें वाचकांस सांगून नंतर त्यांच्याच शब्दांत प्रभूंनी सुदाम्यास घातलेल्या भोजनादिकांचें वर्णन करण्याचा आमचा विचार आहे. प्रभूंनी सुदाम्यास पाहिल्यावर लगबग लगबग अंकिं रुक्मिणी बसली ते पर्यैकी लोटुनि, उडी घालुनी, धांवत धांवत स्वयें येऊनी, ब्राह्मणचरणी मस्तक ठेवुनि, दंडवाने मिठी घालुनी, उठी उठी म्हणतांचि सुदामा चहूभुर्जी कडकडुनी त्यातें दृढ आलिंगुनि, प्रेमबाप वारि तें लोचनीं स्फुंदत स्फुंदृत कडे घेउनी, नाचन नाचत पूर्ति नव्हे प्रियभूर्ति द्विजाची निजासनीं, बैसविली ॥ ” पुढे पाय धुवायला सुरवात झाली:- " नख मातीसह तें सांवरिलें, हळूहळू पतळ कुरवाळुनि कंटक हरिलें, सुगंध शीतळ निर्मलजळ रखमाई ओती कांचनपात्र, प्रक्षाळुनिया अंचळवस्त्रे पुमोनि निर्मळ हृदयीं धरिलें, नेत्रीं लावुनि, मुकुट काढुनी, मस्तकिं विचिलें...... धन्योऽहं कृतकृत्य मतीनें.... चरणोदक सहकुटुंब सेवूनि......नवकेशर घनसारमलय पाटीर् घनरसें भाळ वर्चि, सुखकारक शशिकिरणकरें उद्वर्तुनिया सर्वांग अर्चिलें... दशांग गुग्गुळ धूस्कूपभर तूप यूपसन तूळवर्तिका सूपसविस्तर दीपमालिका कूप लाविले अमूव मध्ये भूप विप्रवर रूप भव्य भरपूर आणि कर्पूर दिवे बहु परिमळ वाहे.. पंचखाद्य नैवेय हृद्य मृदु... ... वाद्यपुरस्सर पद्यगद्य अनवद्य सद्यमुख विद्यमान, शुभनद्य जलाशय, मध्यमध्य पानियासहित श्रीआद्य हरीनें नैवेद्य समर्पुनि वेदवेद्य ब्राह्मणापुढे त्या”....नंतर भोजनासाठी केलेली बाह्य तयारी पहा:- “नवे केळिचे खांब कोवळे,