पान:भगवान श्रीकृष्ण अथवा श्रीकृष्णाचे नितांत रम्य चरित्र.pdf/६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ ४८ ] । अखंड बैरवशें । चद्यादिकीं ॥ अगा सोयरेपणेंचि पांडवा | माझें सायुज्य यादव । कीं ममत्वें वसुदेवा- । दिकां सकळां ॥ नारदा ध्रुवा अक्रूरा | शुका हन सनत्कुमारा ।

इयां भक्ति मी धनुर्धरा । प्राप्यु जैसा " तसाच वरील मंडळीस त्या त्या उत्कट

'भावनेनेही मी 'प्राप्यु' आहे असें सांगून देव पुढे म्हणतात अगा मी एकु- लाणीचें खागे । मज येवो पां भलतेनि मार्गे । भक्ती को विषयविरागें । • अथवा वैरें । म्हणोनि पार्था पाहीं । प्रवेशावया माझ्या ठायीं । उपायांची 66 - नाहीं । वाणी एथ ॥ अगा कवर्णे एकें बोलें । माझेपण जन्ही जाहलें । तरी 66 " भवबंध -मी होणें आलें । हाता निरुतें, ” असो. तेव्हां अशा त-हेचा “ छंद " -- तुटोनिया " जाणारा छंद-गोपिकांस श्रीकृष्णाचा लागलेला होता, तेव्हां ह्या छंदाचा परिणाम म्हणजे “ ब्रह्मनिष्ठाचें दिव्य तेज त्यांच्या देहावर विलसूं लागलें ” यावाचून " 6 - दुसरा काय होणार ? “ गोविंद गोविंद | मना लागो हाचि छंद ह्या अभंगांत तुकोबांनी तुका म्हणें आळी | जेंवि नुरेचि वेगळी " असा दृष्टांत देऊन-- - व्यवहारांतला उघडा दृष्टांत देऊन--अशा ' छांदिष्ट' मनुष्याची ' काया ' देखील गोविंद ' होते असें म्हटले आहे - ही वर्णनाची हद्द झाली. .6 अशा रीतीनें गोपींचें प्रेम दिव्य -- उत्कट होतें. त्यांच्या प्रेमाचा पूर इतका अपार होता की, त्यांतला एक बिंदु जरी कोणा मानवास प्राप्त झाला तरी तो अपणांस धन्य धन्य मानलि ! त्या उच्च, उदात्त व उत्कट प्रेम-तरंगिणीचें वर्णन एकदां कबीरजींना करण्याचा प्रसंग आला. कबीरजींची रामभक्ति-कृष्णभक्ति कांहीं लहान- -सहान नव्हती. ते थोर अधिकारी पुरुष होते. " नेत्री जळ वाही सदा । आनंदाचे रोमा॑ांच ” अशी त्यांची स्थिति होती. परमेश्वराच्या ध्यानांत गुंगून सात्विक प्रेमा- श्रूंचा पूर त्यांच्या नेत्रांतून धरणीवर लोटत होता ! अशा स्थितींत कबीरजींची स्वारी एकदां रस्त्याने चालली होती. शिष्यांचें वर्तुळ त्यांच्याभोंवत " कबीरजी ! कबीर- जी ! करून नाचत होतें. कबीरांच्या या अद्भुत कृष्णभक्तीनें थक्क होऊन काय ही कबीरजींची कृष्णभक्ति !" अशा तऱ्हेचे उद्गार शिष्यवृंदांतून निघत होते. “ अरेरे ! " आपल्या शिष्यांकडे वळून ते म्हणतात, कबीर कबीर क्यां कहे ले गये जमुनातीर । एक एक गोपीसें प्रेम में कबीर ! कोट्यावधि कबीराचें प्रेम एका एका गोपीच्या वांट्याला आलें होतें. "बाळांनो ! कबीर बहगय कोट "" - म्हणाले " असे कोटयावधि कबीर एका एका गोपीच्या प्रेमात- त्या दिव्य- स्वर्गीय, उत्कट प्रेमांत वाहून गेले आहेत बरें ! ' कबीर कबीर' म्हणून माझी -