पान:भगवान श्रीकृष्ण अथवा श्रीकृष्णाचे नितांत रम्य चरित्र.pdf/६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ ४७ ] असें तुकोबानीं त्यांचे कौतुक केले आहे. " राम म्हणे करितां धंदा | सुखसमाधी i " त्या सदा ह्या तुकोक्तीप्रमाणें श्रीकृष्णाच्या चिंतनाच्या सुखसमाधीत डुलणाऱ्या त्या ' विदेही ' गोपी होत्या ! " देह तरी वरिचिलीकडे । आपुलिया परी हिंडे । परी बैँसका न मोडे । मानसींची " या ज्ञानोक्तीप्रमाणें सर्व कामधाम करतानांसुद्धां त्यांच्या हृदयांत अखंड श्रीकृष्णध्यानाची बैठक विराजमान असे. " भ्रमण चक्रीं न भवे । ध्रुवु जैसा " ह्या ज्ञानेश्वरप्रतिपादित न्यायानें व्यवहारांतल्या व गृहकृत्यां- तल्या सर्व कामांत एखाद्या भोव-याप्रमाणे जरी त्यांचा देह फिरत असला तरी त्या भवऱ्यांतल्या मध्यबिंदूप्रमाणे त्यांच्या हृदयांतली श्रीकृष्णचिंतनाची समाधी सदा स्थिरंच असे. अर्थात् अशा तऱ्हेच्या गोपींच्या दृढ चिंतनाचा -- श्रीकृष्णछंदाचा- परिणाम 66 मन राम रंगले अवघें मनचि राम झालें ” असा झाला-- " व्रजांगनांचीं निजें " श्रीकृष्णस्वरूप झालीं - - ह्यांत काय आश्चर्य ? " वालभाचेनि व्याजें - च ही गोष्ट झाली हें खरें व मनश्चिंतनाच्या दृष्टीने त्यांच्या हातून मानसिक व्यभिचार झाला असे फार तर केवळ ऐहिकांतच बुडलेले क्षुद्रजीव म्हणोत; पण अशा तऱ्हेच्या मानसिक " व्यभिचारा " नेंच शेवटीं गोपी मुक्तिपद पावल्या- “ अव्यभिचारिणी ” भक्तीच्या पराकोटीस जाऊन पोहोचल्या - ही गोष्ट निःसंशय आहे. व अशा तऱ्हेचा मानसिक व्यभिचार हा कितीही लौकिकास, शास्त्रप्रवृत्तीस, विधिविधानास, धर्मास विरुद्ध असला तरी तो खुशाल करावा - त्याने जर देव जोडत आहे तर खुशाल करावा हेच तुकोबांचें सांगणे आहे. "देवाच्या सख्यत्वासाठीं' वाटेल त्या धर्मावर लाथ मारली तरी त्या पापा पासून तोच प्रभु मुक्त करतो अशी त्याची जाहीर ग्वाही आहे आणि हीच परभार्थाची नीति आहे हें आम्हीं वर सांगितलेच आहे. श्रीकृष्णाचा छंद लागावा- त्यांनी मन वेडें व्हावें हेच ध्येय आहे; कारण त्यानेच त्या ध्यात्याची काया सुद्धां श्रीकृष्णस्वरूप बनते असा निसर्गाचा रोकडा सिद्धांत आहे. मग तें वेड, तो छंद, तो ध्यास, ती तळमळ, ते उत्कट चिंतन, वाटेल त्या मार्गानें लागो - त्याला “" उपायांची नाहीं । वाणी एथ" असें तो सदय व सहृदय परमात्मा 'बाहे' उभारून सांगत आहे. किती तऱ्हेनें हें कार्य करता येतें त्याची यादीच ज्ञानोबा देतात ती ऐका, म्हणजे वाचक ! ह्या उपायवैविध्याची आपणांस पुरी ओळख पटेल:- “ पाहे पां वालभांचेनि व्याजें । तिया व्रजांगनांचीं निजें । मज मीनलीया काय माझें । स्वरूप नव्हतीं ? ॥ नातरी भयाचेनि मिसें । मातें न पविजेचि काय कसें । को 66 ""

-

5 6