पान:भगवान श्रीकृष्ण अथवा श्रीकृष्णाचे नितांत रम्य चरित्र.pdf/४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ ३३ ] 66 शरीराच्या पकडीत त्यास चेंचून मारावा म्हणून तो दुष्ट कालिया आपल्या शेपटीचे वळसे श्रीकृष्णाच्या देहाभोंवतीं घालूं लागला ! प्रभूंनीं शांतपणे त्याला वळसे घालू दिले च नंतर त्याचें डोकें व शेपटीचें टोंक आपल्या वज्रपंजर अशा दोन हातांत पकडून त्यांनीं आपलें अंग फुगविण्यास सुरवात केली. त्याबरोबर तटातट त्या शेपटीचे वळसे तुटून ढिले होऊं लागले. कालिया आपल्याकडून ते आवळण्याचा यत्न करी पण पुन्हां देवांनी आपलें शरीर पहिल्याहून अधिक फुगविलें कीं कदिशीं कालि- याचा फांस ढिला होई ! शेवटीं कालिया रक्तबंबाळ झाला. जागोजाग त्याचे शरीर फाटून त्यांतून रक्त वाहूं लागलें. “ शरीरी फांसोळ्या बहु खुळखुळ्या होउनि ढिल्या गती तत्प्राणांच्या सकळहि गळ्यामाजि शिरल्या " अशी स्थिति झाल्यावर त्यानें आपले कृष्णार्भोवतींचे वेढे काढले व " चुळचुळे निसटे वरच्यावरी" अशी त्याची पुन्हां धडपड सुरू झाली; पण श्रीकृष्णांनी त्याला जास्त मस्ती करायला अवसर न देतां ताबडतोच त्याच्या पांच फडांच्या नाकांत वेसण घातली व त्यावर आरोहण करून उजव्या हातानें त्याची वेसण व डाव्या हातानें त्याचें शेंपूट धरून त्यावर त्यांनी नाचायला सुरवात केली. शंकरादिकांचेहि नाट्यगुरु श्रीकृष्ण भगवान् एखाद्या नटासारखे त्याच्या पाठीवर नाचूं लागले. " अंतर्यामी जाणे जन झाले वेडे । नामा म्हणे वेढे काढीतसे " आणि मग " तयाचे मस्तकीं नाचे नारायण । आरंभी गायन जगदीश. लवकरच चेंचून चेंचून त्यांनी त्याला बेदम केला तेव्हां तो प्रभूला शरण आला ! हें पोर सामान्य नव्हे, साक्षात् परमात्म्याची सगुण मूर्ति आपल्या पाठी- चर-मस्तकांवर-नाचत आहे हें त्यास उमगलें व तो प्रभूला शरण गेला ! प्रभूंनीहि मग त्याला अधिकळून चेंचतां त्यास जीवदान दिलें व त्यासह पोहत पोहत ते वर आले. जलाच्या पृष्ठभागावर जेव्हां त्या नटाची ती नाट्यलीला दृष्टीस पडली-का- लियाच्या पाठीवर आरोहण करून कोमल नृत्य करणारी प्रभूची ती श्यामसुंदर मूर्ति जेव्हां सर्व व्रजांनी पाहिली तेव्हां त्यास पहावयास अधीर झालेल्या सर्वत्रांस किती आनंद झाला असेल - आपला जीव आपणास परत मिळाला म्हणून त्यांनी कवढा जयघोष केला असेल याची कल्पना वाचकांनींच कररावी ! त्या वेळेस आकाशांतून देवांनीं श्रीकृष्णावर पुष्पवृष्टि केली. नदीकांठचे वृक्षांनीही आपल्ली पुष्पे त्यावर ढाळून त्याचें स्वागत केलें ! " डोहाच्या पृष्ठभागावर आल्यावर प्रभूंनी त्या का- लियास एक थप्पड मारिली व जा ! आत्तांच्या आत्तां या डोहांतून निघून जा. आणि याद राखून रहा. पुन्हा जर इथें येशील तर ठारच होशील हे खूप समज. "" - (6 ! 18 ३