पान:भगवान श्रीकृष्ण अथवा श्रीकृष्णाचे नितांत रम्य चरित्र.pdf/४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ ३२ ] " जीवन कृष्णनाथ. " नंदाची स्थिति तरी किती शोकाकुल झाली पहा -" चिंतेनें व्या- कुळ पिटी वक्षस्थळा | दावारे सांवळा प्राण माझा ॥... समस्तांची दृष्टी करी तुज कष्टी । म्हणोनी जगजेठी टाकियेले ॥ गोकुळींचे जन देऊं पाहे प्राण | वांचाया का- -रण काय आतां ! ” सर्व गोकुळाच्या जीवींचा जिव्हाळा अशा संकटांत असतां स्थिर- चर सृष्टी याप्रमाणे शोकानें भरून गेली. सर्वजण धांवत येऊन त्या डोहाचे कांठीं उभे राहिले. आपल्यामुळे हें प्रभूवर संकट कोसळले असे वाटून बिचारा वाकड्या तर ढसढसा रडायला लागला ! गोकुळांतील सर्व लोकच काय पण गाईवांसरांची व सचेतन अचेतन सृष्टीची स्थितीसुद्धां हवालदील होऊन गेली व प्रभूच्या सुखरूप आगमनाची प्रत्येकजण सोत्कंठ हृदयानें वाट पाहूं लागला. गोकुळाच्या त्या कलि- जाला- त्या पंची प्यायला सुखी ठेवण्यासाठी सर्वजण त्या जगच्चालकाची प्रार्थना करूं लागले ! 66 इकडे श्रीकृष्ण धाङ्कन त्या डोहांत उडी मारून खालीं खालीं पोहत चालले. त्यांना त्या कालियाचा अत्यंत राग आला होता व त्या सपाट्यांत ते त्यास ठारच करणार होते. पण कालियाच्या दोन बायका- सर्पिणी प्रथम प्रभूस सामोन्या आल्या ! " कुठ तो कालिया ?” देव खवळून म्हणाले "त्यास एक लाथ मारीन तर तुझांस विधवाच करून टाकीन!” ‘‘देवा !” त्या सर्पिणी संतप्त प्रभूची स्तुती करून म्हणतात " कर्तु- मकर्ते असें आपलें सामर्थ्य आहे! पण त्याचबरोबर आपण दीनवत्सल आहांत व शरणागतास अभयदान देणें है तर आपले ब्रांद - हा " ब्रीदाचा तोडर "-च- राचरांत गाजत आहे. देवा ! आम्ही तुम्हांला शरण आहों " आम्हांलागीं आतां देई चुडेदान । " -आमचें सौभाग्य कायम ठेवा एवढेच आमचें तुमच्याजवळ मागणें आहे ” असें म्हणून “ धरिती चरण कृष्णजीचे. " त्या वेळीं दयाघन प्रभूचें हृदय द्रवलें ! त्यांची ती केविलवाणी प्रार्थना ऐकून त्या ( शरणागतभयशमनास ' करुणा आली व त्यांनी " कालियास ठार करीत नाहीं " असे त्यांस अभयदान दिलें ! 66 प्रभू तसेच झपाटयानें पोहत खालीं निघाले व डोहांत तळाशीं निजलेल्या त्या अजस्र सर्पाच्या धुडास त्यांनी एक सणसणीत लत्ताप्रहार केला ! त्याबरोबर दचकून तो सर्प वर पाहूं लागला तो एक चौदा पंधरा वर्षाचें झगझगीत पोर ! पोर खरें थोराहूनही थोर होतें हैं त्या कालियास काय ठाऊक ? त्यानें आपल्या विषाचे लोळच्या लोळ त्या बालकाच्या अंगावर फेकण्यास सुरवात केली. पण त्यावा कांहींच परिणाम होत नाही असे पाहून मग आपल्या अजस्र-