पान:भगवान श्रीकृष्ण अथवा श्रीकृष्णाचे नितांत रम्य चरित्र.pdf/३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
भाग दुसरा.

 वाचक ! ते पाहिलेत का गोकुळ ? गोवर्धन पर्वताच्या पायथ्याशीं वसलेल्या त्या गोकुळाचें कुठवर वर्णन करावें ? तो झुळझुळ वाहणारा वारा, ते उंचउंच वृक्ष व त्यावरील पक्ष्यांचा किलबिलाट, गाईचा तो हंबारव, आणि उंच सदृढ असा तो गोपगोपींचा समाज, त्या झोंपड्या, ते गाडे, तीं अंगणे या सर्वांची मौज कांही औरच होती. झुलपे ठेवलेलीं व दारोदार खेळणारी ती गवळ्यांचीं पोरें व गाईंचीं वासरे ह्यांच्या चैतन्यानें गोकुळांत नवजीवन भरून राहिले होतें. प्रभातकालीन आरक्त रविमंडळानें आपलीं कोमल ताम्र किरणें यशोदेच्या खोलीच्या गवाक्षांतून आंत पाठवून तिला जागृत केलें. यशोदा जागी होऊन पहाते तो आपणास एक अत्यंत कमनीय बालक झालें असून तें आपल्या हंसया कपोलानें व नेत्रानें आपल्याकडे पहात पडलें आहे ! त्याकडे पहातांच यशोदा इतकी तन्मय झाली की तिची तंद्रीच लागायची वेळ आली. पहिल्याच दृष्टिपाताबरोबर जन्मभर जगास झुलविण्याची जादू त्या जगन्नियंत्यावांचून इतर कोणास साधणार आहे ! यशोदा लवकरच शुद्धीवर येऊन जवळच निजलेल्या आपल्या दासीस हाक मारून त्या गोजिरवाण्या सुंदर बालकास दाखवीत म्हणते “ श्यामे ! पाहिलेंस का किती सुंदर बाळ आहे ते ? मला पहिल्याच खेपेस मुलगा झाला ही परमेश्वराची आपणावर किती कृपा ! ” इतक्यांत प्रभुराजानों मंदहास्य केले. " गुलामा ! हंसतोस का ? चहाटळ कुठचा ! " यशोदा ह्मणाली " पण श्यामे, किती ग माझं बाळ गोजिरवाणं व सुंदर आहे! ” असें म्हणून आलेला पान्हा पाजण्यास प्रभूला यशोदेनें स्तनाशी घेतलें. मुलीच्या जन्मापेक्षां मुलाचा जन्म असा आनंददायक असतो च त्याच आनंदाने सर्व गोकुळ भरले. कारण लवकरच ही बातमी नंदराजाच्या नंद हा सर्व गवळ्यांचा मुख्य, सर्वांत श्रीमंत व सुखी असल्यामुळे त्यास नंदराज म्हणत असत-- व सर्व गोकुळांतील गोपगोपींच्या कानावर जाऊन नंदाच्या त्या मनमोहन लेकरास पाहण्यास सर्व गोकुळ लोटले ! नंदानें पुत्रजन्मानिमित्त मोठा आनंदोत्सव केला. बाराव्या दिवशीं बारसें मोठें थाटांत करून मुलाचें नांव त्याच्या सावळ्या वर्णानुरूप ( श्री ) 'कृष्ण' असे ठेवण्यांत आलें. यदुवंशीय क्षत्रिय सरदाराचे पोर्टी येऊन वैश्यांतहि दुर्मिळ असा सांवळा वर्ण प्रभूनीं कां बरें