पान:भगवान श्रीकृष्ण अथवा श्रीकृष्णाचे नितांत रम्य चरित्र.pdf/१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[३]

 वरील प्रमाणे वसुदेव-देवकीस बंदींत घालून खुळा चिचारा कंस त्यांतल्या त्यांत समाधान मानून राहिला. त्या अभागी जोडप्यास बंदिवासांत घातलें तेव्हां त्यास कुठें थोडेंसें हायसें वाटलें. पण त्या खुळ्याला असे कळेना कीं, यानें का आपला मृत्यु टळणार आहे ? परीक्षिति राजा समुद्रांत जलमंदिर बांधून त्याच्या वरच्या मजल्यावर राहिला तरी बोरांतल्या आळीचा सर्प बनून तो शापाप्रमाणे सर्पदंशानेंच मेला ! होणारे प्रारब्ध - विधीची रेषा टाळणें महाकठीण आहे व दुष्ट व पापी दुरात्म्यास तर तें अशक्यच आहे. परंतु याची त्या वेड्या कंसाला कोठून दाद असणार ? स्वतःचा जीव बचावण्यासाठीं तो उपायाच्या रूपानें एक एक पापाची व दुष्टपणाची मात्र आधींच्या पातकांत- ज्यासाठींच त्याचा नाश होणार होता त्यांत-भर घालूं लागला. अशा रीतीनें ‘बुडत्याचा पाय खोलांत' या न्यायानें तो जे उपाय म्हणून करूं लागला तेच मूर्तिमंत अपाय बनून त्याचा मृत्यु अधिकच जवळ आणण्यास कारण झाले. ' विनाश काले विपरीतबुद्धि' व्हायचीच. आणि हालवून खुंटा बळकट करून घेण्यासाठीं मथुरेच्या बाहेरच्या बगीचांत तळ देऊन त्यास बोलावून घेणाऱ्या नारदांनीं जेव्हां त्यास काय आठवा पुत्र तुझा वैरीना ? म्हणून विचारलें तेव्हां कंस गदगदां हंसला व " सगळींच कारटीं मारून टाकतों म्हणजे आठवा अन् नववा ही भानगडच नको. देव मला कदाचित् फसवीत असतील, पण मी असें तसें काम करणारा नाहीं आहे म्हणावं, मी पक्का शेराला सव्वाशेर आहे. एकजात गळी कार्टी मारून टाकतों. काय नारदा ? आहे की नाहीं झकास बेत ? हा ! हा ! हा ! " कंसाने अट्टाहास करीत नारदास प्रत्युत्तर दिलें. त्याचा तो भीषण विचार ऐकून नारदासारख्याच्याहि अंगावर क्षणमात्र शहारे आले ! पण कंसासारखा पापाच्या खोल दरींत बुडालेला - शेवटच्या पायरीवरूनहि घसरलेला व जन्मभर डायरशाही गाजवणारा नराधम जितका लवकर मृत्युवश होईल तितकें चांगलेच. कारण पृथ्वीचा भार तितकाच हलका होईल, असा विचार करून नारदानींही वरकरणीं हँसून “ वा: कंसा ! तूं देवाहूनहि वस्ताद आहेस रे! " अशी त्याची पाठ थोपटून ते आकाशमार्गे ईश्वरभजन करीत चालते झाले.

 देवकीच्या पोटीं येणाऱ्या प्रत्येक कारट्याला जन्मतःच शिळेवर आपटून ठार मारण्याचें कंसानें ठरविलें, व त्या अभागी दंपत्याच्या तुरुंगावर कडेकोट पहारा ठेवला व देवकीस मूल झाले हे कळल्याबरोबर तो दुरात्मा तत्काळ तुरुंगाकडे निघाला. अरेरे! पोटच्या गोळ्याचा - तान्ह्या बालकाचा - नवजात अर्भकाचा असा निर्दय खून