Jump to content

पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/९९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सालरजंग प्रकरण व मद्रास. 6 पुण्यास येतच नाहीत, असेही मंडळीस वाटले. परंतु 'घावरण्याचें कारण नाहीं, ' असें महाराजांनी सांगितल्यावरून नानासाहेब थोडे स्वस्थ होते. इकडे येण्याचा विषय खेरीज करून उभयतांचा पत्रव्यवहारही होता, व अण्णासाहे- बांचे पत्र आलें ह्मणजे आळंदीस जाऊन महाराजास दाखवावें, असा नाना- साहेबांचा परिपाठ होता. यावेळी अण्णासाहेबांस एक थोरली मुलगी, व एक मुलगा अशी दोन अपत्यें होतीं. त्या काळच्या रिवाजाप्रमाणे मुलीचे लग्न लांबणीवर टाकर्णे शक्य नसल्यामुळे, नानासाहेबांनी तें उरकून घेतले. मुलाच्या मुंजीकरितां तरी अण्णासाहेबांनी यावें, अशी त्यांची इच्छा होती, परंतु अण्णासाहेब तर अनेक प्रकारची साधनें करीत मद्रासेस तळ देऊन वसले. त्यांचा येथून हालण्याचा कांहींच रंग दिसेना. ७८ मद्रासेस असतांना घडलेल्या पुष्कळ गोष्टी ते सांगत. मंत्रशास्त्राच्या प्रती- तीची, किमयेच्या प्रयोगाची, दूरदर्शनाची, कालीय सर्पाची, वगैरे त्यांतील प्रमुख होत. मद्रास जवळ मैलापूर ह्मणून एक लहानसें गांव आहे. तेथे एक मिशनरी आपलें पांडित्य प्रगट करीत असतां, एका हलक्या जातीच्या मनु- घ्यास राग येऊन त्यांचा वाद झाला. अण्णासाहेबही त्यावेळी तेथेंच उभे होते. शेवटी ' अरे साहेब, तुला मंत्रतंत्राची प्रतीती पहावयाची आहे काय ? ' असें ह्मणून त्या इसमानें, जवळच कोळसा पडला होता तो घेऊन, समोरच्या दगडावर एक मोठा सनाटा विंचु काढला, व साहेबांस त्याच्या नांगीस हात लावण्यास सांगितले. केवळ त्याची टर उडवावी ह्मणून, पाद्री भटानें नांगीवर जोरानें वोट ठेवलें. तोंडानें कांही तरी वडबड चालूच होती. बोट ठेवले मात्र, तोंच मोठी किंकाळी फोडून त्याने जमिनीवर लोळण घेतली व त्याची आग शांत करावी ह्मणूनच की काय, त्याची इमानी टोपी जवळच्या गटारांत पाणी भरण्यास गेली !! हा प्रकार पाहून सर्वांची अक्कल गुंग होऊन गेली. पोलिस जमादार तेथेंच उभा होता, परंतु त्यासही कांहीं करतां येईना; कारण तो इसम तर दुसरे कांहींही न करतां शांतपणानें उभा होता. अशा स्थितींत काय करावें तें सुचेना, व साहेब तर ' मेलों ! ' ह्मणून आरडत पडला होता. सरते शेवटीं जमादार साहेबांनी त्या इसमाचीच पायधरणी केली, व पाद्री साहेबांस वांचव, ' ह्मणून सांगितलें. तेव्हां 'बरें आहे ' ह्मणून, त्यानें तोंडा- कडून हात फिरवून तें चित्र पुसून टाकले. त्यासरशी पाद्रयाच्या सर्वांगांतील