पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/९८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

परिवर्तनाचे कारण, व अण्णासाहेबांची थोरवी. संध्याकाळची सकाळ होईल, असे मानण्याचे कारण नाहीं. रात्र जावयाची आहे. पण चक्र फिरलें एवढें खास. कांहीं तरी फायदा होईल." इतक्या स्पष्ट- पणे या विषयावर पुन्हा केव्हांही ते बोलले नाहीत; असो. इतकें खरें कीं, मद्रास येथें असतांनाच, अर्जुनास ज्याप्रमाणें युद्धाचे भवि- तव्य श्रीकृष्णांनी दाखविले, त्याचप्रमाणे कशाही रीतीनें असो, पुढची मांडणी दिसून आल्यामुळे म्हणा, अथवा इतर कोणच्याही रीतीनें म्हणा, या देशाच्या उद्धारास ईश्वरीकृपा व ईश्वरीसामर्थ्य यांची आवश्यकता आहे, अशी अण्णा- साहेबांची खात्री झाली; व स्वतःच प्रत्येक गोष्टीस लागण्याच्या त्यांच्या स्वभावास अनुसरून, कोणचीही गोष्ट घडवून आणण्याचें त्या बाजूचें साधन जें तप, त्या उग्र तपास ते स्वतःच बसले; आणि तें त्यांनी किती अवंचकतेने व कठोरपणानें ३६ वर्षे अव्याहत केले, ते पुण्यांतील सर्व दर्जाच्या बायकां- पोरांपासून सर्वांसच ठाऊक आहे. त्यांचा स्वतःचा शहाणपणाचा आणि विद्वत्तेचा अतिशय मोठा लौकिक होता. त्यांच्या ऐहिक उत्कर्षाकडे सर्व आप्त- इष्ट व परिचित यांचे डोळे लागून राहिले होते; व तो उत्कर्षही इतका प्रचंड होणारा होता की, संपत्तीच्या दृष्टीने त्यांना सारा वाडा सोन्यानें भरून टाकतां आला असता, व कॉलिफोर्नियापासून तो टोकिओपर्यंत सर्व जगाला हालवून सांडणारी ख्रिखंड कीर्ति निळवितां आली असती. संबंध हिंदुस्तानचें निर्विवाद नायकत्व अथवा अनभिषिक्त भूपतित्व तर त्यांच्या हातचा मळ होता. पुढें देखील, त्यांनी साधु या नात्यानें तोंडांतून एक शब्द काढला असता, त कोणी कधी ऐकलेही नाही असे त्यांचे देव्हारे माजले असते ! येवढें वैभव, व असामान्य कीर्ति आणि सत्ता, ही नुसतीं पायाखालीं तुडवून टाकावयाचींच न॰े, तर सकल स्वजनांचीं अंतःकरणे करपून टाकून इरसाल मूर्खपण' अथवा भ्रांतिष्टपणा पदरांत घेऊन, एकाद्या सामान्य माणसाप्रमाणे रोजच्या फिकीरी डोक्यावर घ्यावयाच्या, व वर पुन्हा अयाचितपणें आयुष्य काढण्यास तयार व्हावयाचें, या विक्षिप्तपणास केवढी छाती पाहिजे, केवढा दृढविश्वास, व किती कळकळ पाहिजे, यांची अंशतः तरी कल्पना करून पहावी; व या मोठेपणास कोठें तोड आहे कां, म्हणून सांगावें. ७७. याप्रमाणें दिशा पालटल्याबरोबरच त्यांना वेड लागल्याच्या, दाढी वाढवून ते जोगी बनल्याच्या, वगैरे अनेक अफवा पुण्यास येऊन थडकल्या. ते आतां.