पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/७९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मुंबईतील बारा वर्षे. प्रकरणांतील अण्णासाहेबांच्या कामगिरीचा इतिहास बाहेर येण्यास आता कांहीच मार्ग नाहीं, ही फार दिलगिरीची गोष्ट आहे. मुंबईस यांच्या संग्रहास जी माणसें होती, त्यांमध्यें माबवराव नामजोशी या कारवाई गृहस्थाचा यांना बराच उपयोग झाला. अनेक तऱ्हेचे उद्योग करण्याची उरकशक्ति यांच्या अंगी किती होती, हें यांच्या न्यूस्कुलांतील, वगैरे कामगिरीवरून दिसून आलॅच आहे. यांची सोय करण्याकरितां म्हणून पुढे 'किरण' नांवाचें मराठी, आणि 'डेक्कन स्टार' नांवाचें इंग्रजी पत्र अण्णासाहेबांनी पुण्यास काढलें होतें. परंतु अनेक उद्योगांमुळे नामजोशांच्या हातून स्वतंत्र रीतीनें काम रेटेना. म्हणून मद्रासेस जाण्यापूर्वी या पत्राचें रूपांतर करून, केसरी व मराठा यांचा अवतार करण्यांत आला. 'केसरी व मराठा, यांचें डिक्लेरेशन माझ्या हातचें आहे,' असे ते या पत्रांविरुद्ध बोलणारांस मोठ्या अभिमानाने सांगत असत. यासंबंधींच्या व्यवहारावर सही करून, आणि तो कायदेशीर रीतीनें पक्का करून लागलीच ते इ. स. १८८० आक्टोबर १२, मंगळवार या दिवशीं मद्रासेस जाण्याकरितां गाडींत बसले. १९१६ साली आक्टोबर च्या नऊ तारखेस रात्री बोलत असतां, आज या गोष्टीस बरोवर ३६ वर्षे झालीं, म्हणून त्यांना आठवण झाली व त्यामुळे भाषण निघून मद्रास प्रकरणांतील पुष्कळ गोष्टी त्यांनी मोकळ्या मनानें सांगि- तल्या. तारखा आणि दिवस हे बारकाईने लक्षांत ठेवण्याची त्यांची हातोटी कांहीं विलक्षण होती. त्यावेळच्या संग्रहांतील उल्लेख करण्याजोगतीं माणसें म्हणजे गणपतराव सहस्रबुद्धे, पेरुअय्या, भिकाजीपंत देशपांडे, भाऊ निरुळकर वगैरे होत. भाऊ- निरुळकर हा मनुष्य मोठ्या मुत्सद्दी डोक्याचा व खोल विचारांचा होता. त्यास इंग्रजीचें ज्ञान मुळींच नसल्यामुळे भिकाजीपंत देशपांडे या इंग्रजी फर्डे जाण- णाऱ्या गृहस्थास बरोबर देऊन. ही जोडी त्यांनी सालरजंगाकडे पाठविली होती, व तेथें यांनीं चांगलीच कामगिरी केली. गणपतराव सहस्रबुद्धे हा गृहस्थ ब्रह्मवर्तास पेशव्यांच्या परिवारांत होता; व कानपूर ग्वालेर वगैरे ठिकाणच्या युद्धांत त्यानें स्वतः तरवार गाजविली होती. बंडाचा मोड झाल्यावर कांहीं दिवस अज्ञातवासांत काढून हा अण्णासाहेबांच्या सहवासांत आला. अण्णासाहे- बांजवळ दोन स्वयंपाकी व वाढपे स्वतंत्र असत, त्यांतील मुख्य काम गणपत-