पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/७८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

त्यागाची सहजवृत्ति; मल्हारराव प्रकरण. मुळे विशेष महत्व होतें. ती अंगठी बोटांत न घालतां अण्णासाहेब जानव्यास लावून ठेवीत; कारण कसलाही अलंकार घालणे यांस कधींही आवडले नाही. एकदां स्नान करीत असतां, कोणी विशेष माहिती नसलेला गृहस्थ यांच्याकडे आली, व 'द्रव्याची कांहीं तरी मदत द्या, मी फार पेंचांत आहे, ' ह्मणून त्यानें याचना केली. त्यावेळच्या मानानें ५/५ शे रुपये दरमहा यांच्या राहणी- वर खर्च होत होता, आणि थोडीबहुत अवांतर मिळकत असे, तरी यांना पैसा कधींच पुरा पडला नाही, आणि हात नेहमीचाच अडचणीत असे. त्या- वेळींही अण्णासाहेबांजवळ पैसा नव्हता, व तो गृहस्थ तर फार निकड करूं लागला. तेव्हां यांनी कमरेची आंगठी काढून चटकन् त्याच्या हातांत टाकली, व 'मुकाट्यानें वाटेस लाग,' ह्मणून सांगितले. नुसती 'कोण, कोठला, ' वगैरे चौकशी देखील केली नाहीं ! परंतु लागवणकर वैद्यांनी त्यास जातांना व येतांना पाहिलें होतें; पुढे अण्णासाहेब पुण्यास आल्यावर सहजगत्या आंगठी नाहिंशीं झाल्याचें घरच्या मंडळीस समजून आले. त्यामुळे त्यांस फार वाईट वाटले, व हळू हळू आंगठीची गोष्ट अण्णासाहेबांस विचारून घेऊन, लागवणकरांच्या साह्यानें त्या माणसाचा पत्ता नानासाहेबांनी काढला. त्याने ती कल्याणास कोणीकडे गहाण टाकली होती. तेथपर्यंत पत्ता लावून व रक्कम देऊन, गहाण नानासाहेबांनी सोडून आणलें ! या सर्व काळांत १८७४ व ७५ हीं साले फार महत्त्वाचीं होतीं; कारण या साली मल्हारराव गायकवाडांचें प्रकरण झाले. या प्रकरणांत रानडे व अण्णा- साहेब यांनी फार उत्साहानें भाग घेतला होता. महाराजांस द्रव्यसहाय्य करण्याविषयों पुण्याहून तार पाठविण्यांत आली होती, हें प्रसिद्धच आहे. स्वतः अण्णासाहेच इंदुप्रकाशचे बातमीदार या नात्यानें बडोद्यास गेले होते, व महाराजांवरील आरोप नाशाबीत ठरण्याजोगा पुरावा पुढे करण्यांत त्यांनी फारच मेहनत घेतली. त्यांनी या प्रकरणांत केवढी कामगिरी केली, व काय खटपटी केल्या, वगैरेंचा सर्व इतिहास खरोखरच फार मनोरम असला पाहिजे. त्यांच्या सर्व प्रयत्नांमुळे खटल्याचे स्वरूप असें कांहीं झालें कीं, अखेरीस ज्यूरांमध्ये मतभिन्नता झालां, व मल्हारराव जरी दोषी ठरविले गेले, तरी त्यांच्या शिक्षेचें स्वरूप सौम्य होऊन, बडोदा संस्थान जिवंत राहिले. या ५७