पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/४६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

समाप्ति. १५५ कल्याणाचा जो कळवळा अखंड हृदयांत वागविला, जो प्रचंड स्वार्थत्याग केला, जी कठोर तपश्चर्या केली त्यांची जाणीव प्रत्येकाचे अंतःकरणास झाल्याखेरीज राहणार नाही. आणि त्यामुळेच त्यांच्या सर्व शिकवणीचें मुख्य सार जें 'व्यक्ति कल्पनेचा नाश ' ' सर्वांकरतां सर्व ' आणि 'सर्वां मिळतीआपण 'त्याची खात्री पटून हॅच ध्येय संपादण्याच्या जबाबदारीची जाणीव प्रत्येकास होईल. अशी जाणीव असूनही अथवा झाल्यावरही तशा तऱ्हेच्या शिस्तीत स्वतःस न घालून घेतल्याबद्दल आपली आपल्यालाच लाज वाटूं लागली म्हणजे लेखकांचें कार्य झालें. इतर ज्याला रुचेल तसें या चरित्रापासून तो उचलीलच. सरतेशेवटीं सौ० भागीरथीबाईंच्या शब्दांत ‘ अण्णासाहेब पटवर्धन । गेले आपुला कित्ता देऊन गिरवा गिरवारे प्रवुद्ध जन । , भाविक जनहो पुरा करा । अशी वाचकांस विनंति करून आणि आमचें मनुष्यपण आमच्यांत पूर्णपणे प्रगट व्हावे म्हणून श्रीअण्णासाहेब यांची सकळां अंतर्यामीं । पूर्ण प्रगट व्हावें । हीनता सर्व जावी । इहपर मुक्तीसी द्यावें । अशी करुणा भाकून तूर्त वाचकांची रजा घेतों. भद्रं नो अपिवातयमनः ॐ शांतिः शांतिः शांतिः ।