Jump to content

पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/४६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१५४ उपसंहार. हैं कसे करावयाचें हा प्रश्न स्वतंत्र आहे. तो विचार या लेख- सीमेच्या बाहेरचा आहे. हैं सर्व घडावयाचें असेल, तेव्हां घडेल; त्याशी आपल्याला कर्तव्य नाही. आपला मुद्दा एकच आहे की ज्या कोणाला या हातभागी देशाचं व स्वतःचेही कल्याण झाले पाहिजे असे वाटत असेल, त्याच्यावर स्वतःस या प्रमाणे जबाबदार होण्याची, व स्वतःस अशा कांहीं तरी शिस्तति घालून घेण्याची जबाबदारी आहे. आभाळ फाटले, त्याला ठिगळ कोण देणार ? असे म्हणून सुटतां येत नाहीं. आणि हेंच मला वाटतें श्रीअण्णासाहेब यांच्या सर्व शिकवणीचे सर्वसामान्य असे सार आहे. श्रीअण्णासाहेब यांच्या चरित्रांपासून जे कांहीं मुख्य घेण्याजोगतें आहे तें हेंच. आणि ते सर्वांनीच घेण्याजोगतें आहे. अण्णासाहेब म्हणजे जशी समतेची मूर्तिच होती आणि जसें समतेनें त्यांनी आपले आयुष्य या पतितराष्ट्राच्या सेवेला अर्पण केले त्याचप्रमाणे त्यांच्या चरित्रापासून मिळणारा हा बोध देखील सर्वांना सारखाच ग्राह्य आहे. मग तो कोणत्याही वर्गाचा कोणत्याही जातीचा अथवा कोणत्याही मतांचा मनुष्य असो. त्यांच्या आंगच्या अपार गुणांचे अनुकरण यथाशक्ति करण्याचें आपले कामच आहे. परंतु श्रीसमर्थांनी म्हटल्याप्रमाणे या सहज गुणांना उपाय नाही. तथापि त्यांनी दिलेला हा मुख्य संदेश लक्षांत ठेवून मनुष्यप्राणी या नात्यानें जगण्याचा आणि मनुष्यप्राणी या नात्यानें जगाच्या बाजारांत किंमत वाढवून घेण्याचा अट्टाहास करणे हेच प्रत्येकाचें काम आहे. श्रीअण्णासाहेब यांचें चरित्र वाचून भिन्न भिन्न प्रकृतींच्या व्यक्तीवर भिन्न भिन्न परिणाम होतील हैं तर उघडच आहे. कोणास त्यांचे उत्तर आयुष्य वायां गेलें असे वाटेल तर कोणांस त्यांतच त्यांचे खरें मोठेपण दिसून येईल; कोणांस त्यांची मतें वाचून स्वतःची कोडी उलगडली असे वाटेल तर कोणाच्या विचारणीस तीं कठीणपणानें बोचून कसेसेंच वाटेल; कोणास त्यांच्या ' प्राप्त पणा ' ची खात्री पटून आनंद होईल तर कोणांस त्यांच्या उत्कृष्ट गुणसंपत्ती नेंच चटका लागेल. परंतु इतकें माल खरें कीं ते ' महापुरुष ' होते व राष्ट्र पुरुष या नात्यानें त्यांची योग्यता अतिशयच मोठी होती या विषयीं कोणाचाही मतभेद होणार नाहीं. त्याचप्रमाणे त्यांचें वागणें पटो न पटो, त्यांची मतें ग्राह्य अथवा अग्राह्य वाटोत, त्यांनी जे उत्कट प्रेम जीवमात्रांवर केलें, त्यांच्या