2 १३६ नंतर. लेंच आहे. हीच समाधि दत्तक घेण्याची शकल 6 स्मारक मंडळां'त निघाली होती. असो. अजून प्रदक्षिणेची वाट वगैरे पुष्कळच गोष्टी व्हावयाच्या आहेत. पूजेअर्चेचीही सोय व्हावयाची आहे. त्यांतल्या त्यांत प्रशंसनीय गोष्ट एवढीच आहे कीं, या स्वतंत्र कार्यकर्त्या मंडळींनी कांहींही झाले तरी श्रीअण्णा- साहेब यांचा वार्षिक उत्सव मात्र अडूं न देतां मोठ्या परिश्रमानें व नेटानें चालू ठेत्रिला आहे ! उडदामाजी काळे गोरे असावयाचेच तरी पण ज्यांनीं स्वतंत्र रीतीनें या कामाची उभारणी केली व उत्सवास सुरवात केली, ज्यांनी ज्यांनी त्यास पुढे मदत करून ते आजच्या स्वरूपास आणिले व उत्सव सुरू ठेविला व पुढेही या कार्याकरितां ज्यांची स्वार्थत्याग करण्याची तयारी आहे ते सर्वच प्रशंसेस पात्र आहेत. तरी पण एवढी गोष्ट खरी कीं पुण्याच्या नांवास साजण्याजोगता हा उत्सव धडाकून होत नाहीं. अनेक संस्था व उत्सव यांना जोमानें चालवि- णाऱ्या पुण्यानें हा कृतघ्नतेचा दोष काढून टाकिला पाहिजे व श्रीअण्णासाहेब यांचेकडून अनेक प्रकारांनी उपकृत झालेल्या पुण्याबाहेरील महाराष्ट्रीयांनीही या कामांत लक्ष घातले पाहिजे त्याचप्रमाणे हा उत्सव केवळ एकांगी न होतां श्रीअण्णासाहेब यांच्या राजर्षित्व व ब्रह्मर्षित्व अशा सव्यसाचीपणास अनुसरून व्हावा हेंही युक्तच आहे. म्हणजे अखंडवणा ठेवण्या बरोबरच व्याख्यान- माला, पुराणे वगैरेचीही जोड त्याच उत्सवास देऊन ज्याप्रमाणें ' वसंत ' वगैरे व्याख्यानमाला आहेत तसेंच हें भक्तिज्ञानाचें संयुक्त सत्र व्हावें. सारांश अण्णासाहेब हे ज्याप्रमाणें केवळ राजकारणी पुरुष नव्हते अथवा केवळ वेदांतीही नव्हते तर राष्ट्रपुरुष होते त्याचप्रमाणे आमच्या राष्ट्रीयत्वा- संबंधानें सर्व प्रकारचा विचार करण्याचें हें एक केंद्रस्थान व्हावें. म्हणजे प्रच- लित काळांत आमचें राष्ट्रीयत्व म्हणजे काय हें जेणेकरून निश्चित ठरेल व त्यामुळे धार्मिक, सामाजिक, नैतिक, शिक्षणविषयक, जातिमूलक वगैरे अनेक प्रश्नांचा उलगडा एका धोरणानें होऊन या ग्रंथांत ठिकठिकाणी सांगितल्या- प्रमाणे नवीन संस्कार व आचारविचारांच्या नवीन परंपरा उत्पन्न होतील, असलेल्या जोमांत येतील किंवा मृतप्राय झालेल्यांचा पुन्हा उद्धार होईल अथवा इतकें सर्व जरी न साधलें तरी निदान खुल्या दिलानें कोणांसही न दुखवितां या सर्व विचारांचा गोपाळकाला जेथें करितां येईल असें पंढरपूर हैं व्हावें
पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/४४९
Appearance