Jump to content

पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/४४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

॥ श्री ॥ नंतर. श्रीअण्णासाहेब यांच्या प्रयाणानंतर काय काय झालें तें सर्व पुण्यास विश्रुतच आहे. तरी पण बाहेरच्या लोकांकरितां त्याचा अगदी त्रोटक इति- हास देतो. निर्याणानंतर लागलीच रेमार्केटांत एक सभा होऊन लोकमान्यांच्या अध्यक्षतेखाली एक स्मारक मंडळ नेमले गेलें या स्मारक मंडळानें आपल्या पुढें प्रथमतः श्रीअण्णासाहेब यांचे समाधिमंदिर बांधून पूजेअर्चेची व्यवस्था करणें व नंतर एक वैद्यविद्यालय काढून त्याला रुग्णालयाची जोड देणें असे दोन उद्देश पुढें ठेविले होते. व त्याप्रमाणें आरंभी थोडासा प्रयत्न करून त्यांनी चार हजार रुपये गोळाही केले. परंतु लवकरच लोकमान्यांना इंग्लंडांत जावें लागलें व तेथून आल्यानंतर थोड्याच दिवसांनी त्यांचेंही देहावसान झाले. त्यामुळे त्यांची उत्कट इच्छा असूनही गोळा झालेल्या चार हजारांपलीकडे कांहीच झाले नाही. स्वतः त्यांच्याही मनास ही गोष्ट फार लागली होती. व असतांना यांनी कार्यकारी गृहस्थांना सांगितले होतें. ते असते तर त्यांच्या सर्व कांहींना कांही तरी केलेच असतें. त्यांच्या नंतर तर काय सर्वच ग्रंथ आटोपला ! महाराष्ट्राचे नेहमीचें दुर्दैव आडवें आलें. समाधी का विद्यालय असा वाद पडून होतां होतां आयती तयार झालेली समाधि दत्तक ( ! ) घेण्यापर्यंत कल्पना निघाल्या व सरते शेवटीं ना धड हे ना घड तें अशी मंडळाची स्थिति झाली. चार हजारांची रक्कम तयार झालेल्या समाधीकडे अर्धी व विद्यालया कडे अर्धी द्यावी असें म्हणजे तिचें व्याज द्यावें असे ठरवून दोन ठिकाणी बँकेत टाकण्यांत आली व मंडळाच्या कार्याची पण समाप्ति झाली ! ते त्याबद्दल स्पष्टपणें व्यापांतूनही त्यांनी अखेरीस आलेली मध्यंतरीच्या काळांत कांही लोकांनी स्वतंत्र प्रयत्न करून श्रीमहाराजांच्या आज्ञेप्रमाणें श्रीअण्णासाहेब यांच्या दहनभूमीवरच समाधीचें काम उभा- रलें व होतां होतां त्यास आज असलेले मंदिराचें स्वरूप प्राप्त झाले. समाधि- मंदिर व त्या भोवतालचा रमणीय देखावा यांचें चित्र या पुस्तकास जोडले-