Jump to content

पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/३६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५६ स्त्रिया आणि वैदिक संस्कृति. म्हटले पाहिजे. अशा तऱ्हेच्या नवीन धर्मपरंपरा उत्पन्न करून देण्याचा ज्यांना अधिकार आहे, अशा लोकांस पूर्वी ' शिष्ट' असे म्हणत असत. अनाम्नातेषु धर्मेषु कथं स्यादिति चेत् भवेत् यं शिष्टा ब्राह्मणा ब्रूयुः स धर्मः स्यादशंकितः ॥ असें म्हणून मनूनें— धर्मेणाधिगतो यैस्तु वेदः सपरिवृहणः । ते शिष्टा ब्राह्मणा ज्ञेयाः श्रुतिप्रत्यक्षहेतवः ॥ असें शिष्टांचें लक्षण सांगितले आहे. ज्यांना श्रुतीची प्रत्यक्षता करता येते, ते शिष्ट. यांतील ‘धर्मेणाधिगतः' हेंहि लक्षांत ठेवण्याजोगे आहे. कोशेना- धिगतः असे श्रुतियोधक 'शिष्ट' नव्हत. असे शिष्ट उपलब्ध नसतील तर, आपल्या कोणचीच निश्चित शास्त्रीय दृष्टी नसलेल्या गुंजभर अकलेनें ' बीचमें मेरा चांदभाई' करून पूर्वपरंपरांचा एकपणा नाहीसा करून, त्या विस्कळित व निर्जीव करण्यापेक्षां, वाटेल तो स्वार्थत्याग करून व जिवापाड धडपड करून त्या कशाबशा राखून ठेवणें, व त्यांची परंपरा कायम राखणे, हेच हाडाच्या ब्राह्मणाचें काम आहे. असे करण्यापासून त्यांचे मुख्य फल जरी पदरांत न पडलें तरी निदान माणसांचें सत्ववीर्य तरी राहतें. कर्मठ मनुष्यांस जरी वेड्यांत काढण्याची रीत आहे, तरी देखील त्यांची तेजस्विता आणि कणखर पणा याचें प्रत्येक उदारमतवादी आश्चर्यच करतो. . सारांश काय की गृहिणीपदाची अत्युच्च थोरवी जाणणा-या वैदिक संस्कृ तीनें स्त्रियांना दास्यांत ठेवलें, हे म्हणणे शोभत नाही. त्याचप्रमाणे फक्त वेदोच्चाराचा अधिकार जरी नव्हता, तरी सर्व प्रकारच्या ज्ञानाचे इतर मार्ग मोकळे होते, त्यामुळे त्यांना अज्ञानांत ठेवले असेंही म्हणतां येत नाहीं. पेशवाईच्या काळांत उच्च वर्गाच्या ब्राह्मण स्त्रिया लिहिणे वाचणें येत असलेल्या आणि व्यवहारज्ञानसंपन्न व बहुश्रुत असत. आणि ब्राह्मणेतर वर्गात जरी लिहिणें वाचणें येत नसले तरीही बहुश्रुतपणा आणि सुशिक्षणाचा खरा संस्कार यांच्या बाबतीत आजकालच्या पदवीधर विदुषीनींही मान खाली घालावी असा अधिकार असलेल्या कैक स्त्रिया असत. स्त्री आणि पुरुष यांची अभेद्य गांठ आणि स्त्रियांचे विनय, शील वगैरेच्या कांही कडक कल्पना, व त्यांच्यामागें