Jump to content

पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/३६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

परंपरा कोणी उत्पन्न करावयाच्या. दुसरीकडे पुनर्जन्म अथवा त्या भक्कम पायावर उभारलेल्या इतर सरण्या तर मानावयाच्या नाहीत, असली धेडगुजरी चालावयाची नाहीं. पूर्वी सांगितलेंच आहे की, वैदिक धर्माची तत्त्वें मान्य असलेला प्रत्येक इसम त्याचे सुखदुःखकारक परिणाम राजीखुषीनें पत्करूनच त्याप्रमाणे आचरण करीत असतो. येथें कांहीं जोरजुलमाचें काम नाहीं. अशा स्थितींत पुरु षांनी स्त्रियांस दास्यांत ठेवलें, वगैरे म्हणणें अप्रयोजक आहे. त्या त्या परं- परांचें वैदिक धर्मास इष्ट असलेले फळ जर पाहिजे असेल, तर त्यांचें परि- पालन त्या पद्धतीनेच केले पाहिजे. येथें कांही तडजोड नाहीं, इतक्या त्या वैदिक शास्त्ररीत्या परिपूर्ण आहेत. या परंपरा जर पालन करवत नसतील, तर, एक तर तें फलच डोळ्यांपुढे ठेवून तेंच मिळवून देणाऱ्या दुसऱ्या पद्धती बसवा, अगर त्या फलाची आशा सोडून वाटेल त्या रीतीनें वागा. ही गोष्ट हिशोबी आहे. परंतु अशा दुसऱ्या पद्धति बसविणें हें काम तडजोडीचें, बहुमताचें, अथवा युक्तिवादाचें नाहीं. वैदिक संस्कृतीच्या प्रत्येक वाबींत इंद्रियगोचर आणि अतींद्रिय विश्वाची 'परस्परं भावयंतः ' अशी सांगड घातली आहे, तशी ती दुसऱ्या पद्धतींत घालतां यावी, म्हणून ज्याप्रमाणें इंद्रियगोचर वि श्वाचे कामापुरतें कां होईना पण उत्तम ज्ञान असणें अवश्य आहे त्याचप्रमाणे इंद्रियांतीत विश्वांतही अधिकार असला पाहिजे. नुसतें बरें वाटतें, कल्पना योग्य दिसतें, अथवा आपल्या टीचभर बुद्धीस (Conscience सारखें ) कांहीं तरी नांव देऊन तिला तें सम्मत आहे, असे म्हणण्यावर हीं कोडीं सुरत नाहीत. " ज्यांनी या परंपरा बसविल्या, ते तरी असे अधिकारी होते का ?" अशी शंका टिकत नाहीं; कारण त्यांनी तो अधिकार प्राप्त करून घेण्याचे मार्ग दाखवून दिले आहेत; आणि ते देखील अनेक आहेत. अशा स्थितीत एकतर आपल्यास इतक्या खोलांत शिरून काय करावयाचें, जेवढे पुढे दिसतें आहे, तेवढ्यापुरतें पाहून मोकळें व्हावें, अशी कमकुवतपणाची डोळेझांक करणे ही गोष्ट वेगळी; परंतु आपण विचारपूर्वक चालतों व प्रमाणशीर ठरेल तेंच ग्रहण करतो, असे तर म्हणावयाचें परंतु त्या मार्गाचा अनुभव घेण्याची सोय असतां पुरतें एक तपही त्यांत घालवावयाचें नाहीं, आणि त्यांस अप्रमाण ठरवून वाटेल तशी जीभ हालवावयाची, यास काय म्हणावें, ते' न जानीमहे ' असेंच