Jump to content

पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/३५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

स्त्रियांच्या अवनतिविषयीं ओरड. its origin in the free and voluntary determination of every individual to abide by the l&w and not any pact force or compulsion of any kind whatever." वरील विस्तृत उताऱ्यांवरून आणि चातुर्वर्ण्य वगैरे प्रकरणांत ठिकठिकाणीं आलेल्या त्रोटक विवेचनावरून वैदिक संस्कृति आणि ब्रह्मविद्याशास्त्र यांचे एकं- दर धोरण काय आहे, हैं लक्षांत येईल. हिंदुस्त्रियांच्या अवनतीची मोठी हृदयस्पर्शी चित्रे काढून आज सारें अवैदिक जग आणि हिंदु समाजांतील त्याचे ' मानस ' पुत्र हे वर्षानुवर्ष हळहळत आहेत. आणि या त्यांच्या हळ- हळण्याचा परिणाम आमच्यांतील मोठ्या धाकट्या विदुषींच्यावरही होऊन त्यांचेही एकापेक्षां एक तारे तुटलेले सभांतून आणि लेखांतून ऐकूं येतात. त्या सर्वांचा मथितार्थ इतकाच आहे कीं, विधात्यानें स्त्रीपुरुषामध्यें जो भेद ठेवला आहे, तो ' देहींच मात्र ' आहे, आणि तो ' संतति कार्याला'च आहे. जणूं कांही हा भेद म्हणजे अगदीं क्षुल्लक आणि 'संतति कार्या'सारख्या एखाद्या किरकोळ क्षणिक कार्यापुरताच आहे ! त्याचें महत्व तें काय ? आणि तो विस- रून गेला असतां, स्त्री आणि पुरुष हे दोन्हीही सारखेच असून दोघांसही श्वान वगैरेंच्या समाजांत ज्याप्रमाणे सर्वच स्त्रीपुरुषांचा सर्व सुखोपभोगाच्या बाबतीत एकमेकांवर सारखाच हक्क असतो, त्याचप्रमाणे अगदीं समसमान हक्क असले पाहिजेत. अशी वस्तुस्थिती असतां पुरुषांनी आपल्या अप्पलपोटे- पणानें स्त्रियांना दास्यत्वांत ठेवून अज्ञानाचे साम्राज्य दिले आणि त्यामुळेच आज हिंदुस्थानांत सामाजिक अवनति होऊन परकीयांचे साम्राज्य झालें. अजूनही जरी डोळे उघडावयाचे असले, तर स्त्रियांस समान हक्क देऊन त्यांचा दर्जा वाढविला पाहिजे, असा सर्वत्र ध्वनि उठत आहे. यांत कांही तथ्य आहे किंवा नाहीं आणि असल्यास काय तथ्य आहे, सामाजिक अवनति स्त्रियांच्या दास्यत्वामुळे आणि अज्ञानामुळे झाली, किंवा सामाजिक अवनती- मुळे हीं दोन मध्यें घुसलीं, आणि समसमान हक्काचे हें खुळ काय आहे, व व त्याचें निराकरण कसे करावयास पाहिजे याचा थोडक्यांत विचार करून, त्या विषयीं अण्णासाहेब यांची कल्पना सांगणे जरूर आहे, इतका तो प्रश्नः आजकाल महत्वाचा होऊन बसला आहे. कोणताही प्रश्न उपस्थित होवो, त्याच्या जोडीस स्त्रीशिक्षणाचें एक शेपूट