Jump to content

पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/३२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

चातुर्वर्ण्य. च्याच सामर्थ्यवृद्धीकरितां आणि निःश्रेयसाकरितां करावयाचा असतो. हे लक्षांत नसल्यामुळे आधुनिक विद्वान् आणि विदुषी, स्त्रियांच्या अवनतीची व शास्त्र - कारांच्या मोंगलाईची गान्हाणी गातात. असो. याप्रमाणे चातुर्वर्ण्याची उत्पत्तीही अध्यात्मविद्येस धरून आहे; आणि म्हणू- नच या संस्थेस चातुर्वर्ण्य हें नांव पडले. कारण योगशास्त्राप्रमाणें प्रत्येक ध्वनीस कांहीं तरी आकार आणि रूप म्हणजे रंग अथवा वर्ण हे आहे. याच्या उलट प्रत्येक रूपास अथवा वर्णास ध्वनि ही एक बाजू आहेच. फक्त आमच्या इंद्रि- यांस प्रेरणा करणारी त्यांची आंदोलनसंख्या आणि शक्ति हृीं भिन्न भिन्न आहेत. जर त्याला अनुसरून अशी आमच्या इंद्रियांस वळणें देतां आली तर आम्हांस कोणचाही पदार्थ त्याच्या पद आणि अर्थ अशा वाटेल त्या स्वरू- पांत इच्छेनुरूप जाणतां येईल. म्हणूनच व्यक्तध्वनीस आणि ज्यांच्या साह्यानें साकारतां येतें ते त्यांचे रंग, यांना 'वर्ण' अशी एकच संज्ञा लावतां आली. मूलस्थानी अथवा शरीरांत इतरत्रही व्यक्त होणाऱ्या ध्वनीचे जे वर्ण तत्रस्थ आकाशांत उमटले पाहिजेत, तसे ते डोळ्यांना पाहून ध्वनि उच्चार बरोबर आहे, असें ठरवले गेलें; म्हणजे वर्ण आणि ध्वनि हे एकमेकांचे ताळे आहेत. ब्रह्मविद्येच्या पात्रतेस पूर्वी सांगितल्याप्रमाणे यांच्या शुद्धतेचें अथवा संकराचे चार प्रकार जेमतेम उपयोगी पडूं शकतात; म्हणून त्यांस वेगळे काढून चातु- र्वर्ण्य असें नांव दिलें. ही गोष्ट निव्वळ कल्पना नसून पातंजलशास्त्रास धरून आहे, हे विसरून अथवा पातंजलशास्त्राचा प्रत्यक्ष प्रयोगानें अनुभव न घेतां त्यास अप्रमाण म्हणून चातुर्वर्ण्य हें कांहीतरी एक थोतांड अथवा खूळ अथवा सामाजिक सोय आहे असे म्हणणा-यांना ' न्यायशास्त्र शिकला नाहींस, चल वाजूला हो, ' म्हणून ज्याप्रमाणे श्रीशंकराचार्यांनी एका वावदूकास ' कशाघात- पुरःसर ' हांकून दिलें, त्याप्रमाणे मूर्ख म्हणून सोडून दिले पाहिजे. याप्रमाणें चातुर्वर्ण्याची सशास्त्र उत्पत्ति आहे, आणि म्हणूनच गीतेंत व्यासांनी 'सृष्ट' असें पद योजिले आहे. एकमेवाद्वितीयम् ' हा महासिद्धांत आणि मनुष्याच्या स्थूल इंद्रियांस •अग्राह्य अशी सूक्ष्म, सूक्ष्मतर अतींद्रिय अस्तित्वें, स्थूल देहांत असतांच, या अतींद्रिय विश्वाशी जाणून, अथवा न कळत दळणवळण करतां येतें, आणि केले पाहिजे ही भावना सर्व विश्वाचे एककुटुंबीयत्व, एकास दुस-याकरितां कर्म 4 1