Jump to content

पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/३२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

स्त्रियांचा प्रश्न. णास अधिक पसंत पडणार नाहीं ? अशा स्थितीत जर इतर वर्गांनी सर्वच तऱ्हेच्या विद्यांस फांटा देऊन तें काम वामणाचें ' म्हणून मोठ्या खुशीनें ब्राह्मणाचा आदर केला असला, तर त्यांत ब्राह्मणांचा काय दोष ? शिवाजी महाराजांच्या काळी पाहिले तरी देखील भाल्याची फेंक करून संपत्ति आणि गौरव मिळवणे यांतच भूषण वाटत असे. अजून देखील वऱ्हाडसारख्या सुपीक. देशांत जेथें या इंग्रेजी विद्येची सर्व साधनें सुलभ आहेत तेथेंही 'शिकून काय करावयाचें ? आहेत दोन नंबर घरी, करील चन' अशी प्रवृत्ति आढ- ळून येते. असे असतां ब्राह्मणांनी इतर वर्गास अज्ञानांत ठेवलें, आणि लबाडीने स्वतःचें वर्चस्व अबाधित ठेवले, असा आरोप करणे नीचपणाचें आहे. याच्या उलट असें मात्र आहे कीं, पेशवाईचा एक अपवाद सोडला तर, ब्राह्मणांनी सत्ता आणि वैभव हीं फक्त विद्येनेंच प्राप्त करून घ्यावयाची असा कडक निर्बंध स्वतःस घालून घेतल्यामुळे, इतर सर्व लोकांस यांचा उपभोग हजारों वर्षे अव्याहत घ्यावयास सांपडला, आणि एक उत्तम संस्कृति, कशाही रीतीनें कां होईना जिवंत राहून तिचा सर्व प्रकारचा फायदा राष्ट्रास मिळाला. असाच प्रश्न स्त्रियांच्याही बाबतीत निघतो. पूर्वी केव्हां तरी स्त्रियांस वेदा. धिकार असावा, हे उघड आहे. कारण कित्येक ऋचांचे ऋषीच स्त्रिया आहेत; आणि अग्निहोत्र्याच्या सहधर्मिणीला कांहीं ऋचा म्हणून अग्नीस समिध देण्याचा अजूनही अधिकार आहे. चौल वगैरे संस्कार स्त्रियांस पूर्वी होते, आणि व्रत- बंधही असावा. परंतु पुढे गृहकृत्यांतच जास्त गढून गेल्यामुळे आणि इतर कारणांनी ज्यावेळेस त्यांची शरीरें वेदोच्चाराच्या उपयोगांत येईनाशी झाली, तेव्हां तो त्यांचा अधिकार काढून घेण्यांत आला. परंतु एक वेद सोडला तर इतर शास्त्रे आणि विद्या, अथवा योग आणि ब्रह्मप्राप्ति, वगैरे कोणाच्याही गोष्टीस त्यांना अडथळा नव्हता. उलट, कोणच्याही तऱ्हेचा योगायोग न करतां श्रीभ- गवद्गीतेने सांगितल्याप्रमाणें 'आत्मार्पण ' रूप श्रेष्ट साधन त्यांच्या हांतून सहज घडावें, आणि तपश्चर्यांनी व योगायोगांनी जें जन्मोजन्म पुरुषांस मिळ- वितां येणार नाहीं, ते एकाच जन्मांत मिळेल, अशा प्रकारचा पातिव्रत्यधर्म • त्यांच्या मार्गे लावून दिला. योगाभ्यास वगैरे साधनें ज्याप्रमाणे देवावर उपकार- करण्याकरितां करावयाची नसून स्वतःकरतांच करावयाची आहेत, त्याचप्रमाणें नवरा हा वस्तुतः दगडाच्या मूर्तीप्रमाणे प्रतीक असून पातिव्रत्याचार हा स्वतः-