Jump to content

पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/३२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१० चातुर्वर्ण्य रूप प्रवाह अथवा पतंजलीच्या भाषेत बोलावयाचें म्हणजे ' शब्दार्थप्रत्यय अवाधित असू शकेल. अर्थात् त्या यंत्रांतून बाहेर पडणारी वेदवाणी ही त्या यंत्रास व सर्वांसच हितकारी होऊं शकेल त्याप्रमाणे अशींही कांहीं शरीरें असतील की, त्यांच्यातून निघणारी वाणी ही जशीच्या तशी बाहेर पडत नसल्यामुळे ती स्वतःस उपकारक होत असली तरी इतरांस तिचा उपयोग होत नाहीं अथवा कदाचित् अशाही विकृततेने बाहेर पडेल की त्यामुळे इत- रांस अनिष्ट असच परिणाम होतील. त्याचप्रमाणे कांहीं शरीर प्रकृति इतक्या बिघडल्या असतील कीं वेदांचा उच्चार होणें इतरांच्या आणि खुद्द त्यांच्याही अनर्थास कारण होईल तसेंच स्वतःस फायदेशीर असलेली वाणी देखील, तिचा फायदा दोन तऱ्हेनें देऊं शकेल. म्हणजे ज्या शरीरांत ती जवळजवळ पूर्ण प्रगट होऊन त्या शरीरास शुद्ध करून ब्रह्मविद्येस पात्र करिते, अशी, - आणि ब्रह्म- विद्येस पात्रता आणण्याइतकी तर प्रगट होत नाही, परंतु सर्व तऱ्हेच्या वैष- यिक सुखाची मात्र जोड करून देऊं शकते अशी; — अशा दोन तन्हा तिच्या असू शकतील; आणि यावरूनच चातुर्वर्ण्य अस्तित्वांत आले. ज्या शरीरांत वेदवाणी सर्वथैव अनिष्टच क्रिया करूं शकते, अशा शरीरांचेही दोन प्रकार होऊं शकतील. जरी वेदमार्गास योग्य नसली तरी योगादि दुसऱ्या साधनांनी ब्रह्मविद्येस प्राप्त होऊं शकतील, अशी कांहीं शरीरें; - आणि ज्यांच्या ठिकाणी हैं कांहीही संभवत नाही, अशी केवळ खाण्यापिण्याचेंच – मग ते 'पुष्क- ळांचें पुष्कळ' असो, अथवा व्यक्तीचे असो, – सुख उपभोगण्याकरितांच योग्य अशी, — असे त्यांचेही दोन वर्ग असू शकतील. वर सांगितलेंच आहे कीं चातुर्वर्ण्याची रचना करणाऱ्या ऋषींना ' एक- मेवाद्वितीयम्' या महावाक्यापासून निःसृत झालेली आणि सृष्टीस उपयोगी पडणारी ब्रह्मविद्या ही जेणेकरून चिरंजीव राहील आणि तिचा फायदा सर्वांस शक्य तितक्या सुलभ आणि जास्त रीतीनें मिळेल, असे करावयाचे होतें; आणि हें करतांनाच व्यक्तीचेंही परम कल्याण घडवून आणावयाचें होतें. व्य- क्तीचे तर कल्याण व्हावयाचेंच, पण त्यांचा विश्वास उपयोग होऊन पुन्हां ती परंपरा कायम रहावयाची, अशी समाजव्यवस्था व वेदासारखें सुलभ साधन यांचा जोड घालून देऊन भुक्ति आणि मुक्ति यांचा त्यांनीं सुकाळ करून दिला. व्यक्तीची मुक्ति कोणीही पाहूं नये, म्हणून ,