पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/३२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

वेदवाणीस शरीरवैशिष्ठ यांची गरज. जेणेकरून तो ध्वनी शास्त्रावर आपला हेतू सिद्धीस न्यावयाचा असें ठरल्यावर, व्यक्त सृष्टीतील इष्ट कार्यांचें मूलभूत ध्वनीच मूलस्थानों उत्पन्न करील, आणि जशी मूलस्थानीं उत्पत्ती झाली, तशीच, म्हणजे त्यांतील वीर्य क्षीण न होतां त्याची वैखरीनें वाच्यता होईल, हें अवश्य झाले. म्हणून ज्या शरीरयंत्रांतून तो ध्वनी बाहेर येईल तें यंत्र विशिष्ट स्थितीत असणें जरूर झालें, निरनिराळ्या हॉर्सपॉवरच्या एंजिनांत जर वाफेची शक्ति कोंडली गेली, तर तिचे जसे-तें एंजिन व्यवस्थेशीर चालविणें, वेफाम होऊन वाटेल तिकडे जाऊन दुसऱ्या वस्तूचा नाश करून कोठें तरी अडकून पडणें, अथवा ठायींच तडकून फुटून जाणें, अते वेगवेगळाले परिणाम होतील, तसेंच शरीरांत वाक्शक्ती उत्पन्न झाली, तर घडून येतील. ब्रह्मदेवानें उच्चारलेली अमूर्तवाचा अथवा वेद यांच्या परस्परसंबंधांत कांही अधडळा नसल्यामुळे ब्रह्मदेवाची मूर्त होत होत सृष्टी- रूपानें अप्रतिहत प्रगट होते. मानवी शरीरांत सर्व क्रिया प्राणाच्या आधारें प्रगट होतात; आणि बहात्तर हजार प्रकारच्या निरनिराळ्या प्रवाहरूपानें शरी- राचे लक्षावधी व्यापार करितात. या सर्व प्रवाहांतून शक्तीचा प्रवाह अव्याहत असेल तर तें शरीर खरोखर प्रकृतिस्थ आहे; आणि ब्रह्मांडाशीं त्याचें साधर्म्य असल्यामुळे तारेनें विणलेले जाळीचें भांडे पाण्यांत बुडवून ठेवावें, त्याप्रमाणे त्या भांढ्यांत आणि विश्वांत सर्व क्रिया एकरूपच असते. हे प्रवाह जसजसे आणि जितक्या कमीअधिक प्रमाणाने मोकळी असतील तितक्या प्रमाणानें विश्वापासून तें शरीर व त्याचे व्यापार हे तुटक होतात, हे सारे प्रवाह ज्या वेळेस बंद होतात, त्या वेळेला शरीरास मृत्यु येतो. शरीर चालण्यास पांच इंद्रियें आणि मन यांचे व्यापार होण्यापुरते तरी प्रवाह मोकळे पाहिजेत; म्हणू- नच " जरी मी जीवरूपानें वास करतों, तरी देखील मनासह इंद्रियें प्रकृतिस्थ असतील तरच हें शरीर चालावतों,' असें भगवंतांनी गीतेत म्हटले आहे. अशा प्रकारची सर्वांत जास्त प्रकृतिस्थ शरीरें निवडून काढून, त्यांच्याकडे वेदो- चाराचें काम दिले असतां त्याचा समाजास आणि समाजमिळती स्वतःसही फायदा होऊन दोघांचेही कल्याण होईल, हे उघड आहे. वर संकलित केलेल्या एकंदर मूल तत्त्वांवरून ध्यानांत येईल की, वेदो- चाराच्या दृष्टीनें चार प्रकारची शरीरें असू शकतील. एकतर अशी कांही शरीरें असूं शकतील की ज्यांमध्ये शब्द आणि अर्थ यांच्यांतील हा संबंध-