Jump to content

पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/३१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आर्य संस्कृति व तिचीं रूपांतरें. संस्कृति अज्ञानांतून निघाली आहे ही कल्पना सोडून दिली पाहिजे. ऋषींनों अतींद्रिय ज्ञानाच्या साहाय्यानें या संस्कृतीची रचना केली, असें म्हणणें जर भोळवटपणाचे वाटत असेल, तर पाहिजे तर तसें म्हणूं नका; परंतु ज्या संस्कृतीत कामशास्त्रापासून तो ब्रह्मविद्येपर्यंत सर्व अंगप्रत्यंगांत कांही तरी एकसूत्रीपणा दिसून येतो, आणि अत्यंत श्रेष्ठ अशा तत्त्वज्ञानाचा आधार त्यास आहे तां संस्कृति अजाणपणांतून निघाली आहे, असे म्हणणें क्षुद्रपणाचें आहे. नानाप्रकारच्या स्थितींचा अनुभव घेऊन सांप्रतच्या अवस्थेत आलेल्या पाश्चात्य संस्कृतीसही हळूहळू या नाहीं त्या रूपानें तींच तत्त्वें मान्य करावी लागत आहेत, व त्याच वळणावर समाजाने जाण्याची आवश्यकता वाटत आहे. परंतु हें आमचें आद्यज्ञान नाहीं आणि शहाणपणाच्या बाबतीत एकादें वडील भावंड आपणास आहे, हें कबूल करणे त्यांच्या 'निर्वीरमुर्वीतलम् ' अशा रगेल समजुतीस लाजिरवाणे वाटतें, आणि शुद्धबुध्दीचे भ्रामक वेड घेऊन चसणाच्या आमच्या इकडील महात्म्यांना ते संकुचितपणाचें वाटतें. निरनिराळ्या तऱ्हेच्या सर्व उत्क्रांतीतून वर गेलेल्या एका अत्यंत विशाल संस्कृ- तीची परिणतावस्था म्हणजेच मूळ वैदिक संस्कृति मनुष्याच्या आयुष्याचें आणि विश्वाच्या अस्तित्वाचें, त्यांच्या परस्परसंबंधाचें 'आणि पर्यवसनाचें सर्व कोडें उत्तम रितीनें सोडवल्याखेरीज त्या संस्कृतीस परिणतावस्था येणें, आणि तिच्यांत एकसूत्रीपणा असणे शक्य नाही. या पूर्ण वैदिक संस्कृतीनें हें कोडें 'एक- मेवाद्वितीयम्' या महावाक्यानें सोडवलें, आणि या आधारभूत सूत्रावर वैदिक संस्कृतीची रचना केली. त्यामुळे वैदिकसंस्कृति, वर्णाश्रमधर्मसंस्कृति, पौराणिक संस्कृति, आणि या सर्वांची हल्लींची विकृति ही सर्व वस्तुतः या मूळ स्वरूपा- पासून उतरत आलेली, परंतु त्या मूळ स्वरूपास न सोडतां घट्ट धरून ठेव- ण्याची धडपड करीत असलेली दिसतात, आणि म्हणूनच पुढील सर्व तऱ्हेचे फरक वस्तुतः उत्क्रांतीच्या पायऱ्या नसून अधःपातास घातलेले तात्पुरते अड- सर आहेत. चातुर्वर्ण्य हाही असाच एक मोठा अडसर आहे, आणि त्याची उत्पत्ति श्रमविभागाच्या तत्वावर बसवलेली नसून निरनिराळ्या शरिरांच्या ब्रह्मविद्याशास्त्राच्या तत्वांस अनुसरून लागणाऱ्या क्षमतेच्या विभागावर केली आहे. पूर्वी सांगितलेंच आहे कीं, 'एकमेवाद्वितीयम्' या महावाक्याची प्रत्यक्ष