पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/३१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

चातुर्वर्ण्य. त्या वस्तूचें हृद्गत खरें समजणे नव्हे. काय आहे हें प्रथमतः जसेच्या तसे समजून घ्या आणि मग एकाद्या विशेष दृष्टीने त्याची उपयुक्तता आणि ग्राह्या- ग्राह्यता पहा. पाश्चात्य संस्कृति कोणच्याही एका निश्चित तत्त्वावर नसल्यामुळे एकाद्या गोष्टीचें मूळ शोधतांना माणसांच्या डोक्यांत जितक्या कल्पना येऊं शकतील, तितकी सारी कारणें संभवनीय ठरतात, आणि प्रत्येक गोष्टीस कांही तरी सामाजिक उपयुक्तता अथवा मनुष्याचे अज्ञान आणि लबाडी हेंच मूळ कारण आहे, असल्या दृढ ग्रहावर त्यांचें सारें संशोधन असल्यामुळे, त्यांना इतर संस्कृतीचे अंतरंग कळणें शक्य नाही. याशिवाय, ऐतिहासिक कालाची अत्यंत संकुचित कल्पना स्वतःचें श्रेष्ठत्व स्थापित करण्याचा दुरभिमान, इत्यादि दोषांमुळे पाश्चात्य पंडितांची अत्यंत प्रशंसनीय तपश्चर्याही परिणाम सत्य- पराङ्मुखच असते. पाश्चात्य गुरूपासून संशोधनाच्या पद्धति शिकलेल्या आमच्या हिंदी विद्वानांच्याही बावतींत तर हें अधिक प्रमाणानेंच भरतें, ज्या पायावर हल्लींची आमची संस्कृति आहे, ती वर्णाश्रमधर्मसंस्कृति आणि तिला वीजभूत अस लेली वैदिक संस्कृति, या फार पूर्वीच नष्टप्राय झाल्यामुळे, आणि ज्या सामग्रीवर म्हणजे वाजाय आणि आचारादिक इतर साधनें यांच्यावर हें संशोधन व्हाव- याचें त्या सामग्रींत या तिन्ही संस्कृतावस्थांची सरमिसळ झाल्यामुळे तर अति- शयच कठीण काम झाले आहे. अशा वेळीं, या तीन अवस्थांची भिन्नता आणि एकरूपता, त्यांच्यांत अवस्थांतरें होण्याची कारणे, आणि त्या दृष्टीने त्यांची उपयुक्तता, या सर्वांचा समन्वय न करतां कांहीतरी अनुगमावस्थेतील कल्पना डोक्यांत घेऊन विचार करणारांनी काढलेलीं अनुमानें सुंदर दिसली तरी सत्यास चरून कशीं होतील ? हाच प्रकार वर्णाश्रमसंस्थेच्याही बाबतींत झाला आहे. श्रमविभागाच्या तत्त्वावर चातुर्वर्ण्याची उत्पत्ति आणि इतर सर्व वर्णांस विद्यावं- चित करून स्वतःचेंच श्रेष्ठत्व अबाधित ठेवण्यांत ब्राम्हणांनी केलेली लबाडी, यांच्यावर त्याचें जीवित्व आहे, असें यांनी ठरविले आहे. पूर्वी केव्हां तरी समाजांत सारीच सवर्णता असून चातुर्वर्ण्य हॅ मागून निर्माण झालें, याविषयीं संस्कृत वाङ्मयांत एकवाक्यता आहे. आणि त्याप्रमाणे पुन्हा सवर्णता करणे अवश्य वाटल्यास तसे करणें अवश्य म्हणून करा; परंतु तेवढ्याकरतां चातुर्व- र्ष्याचें मूळस्वरूप विकृत करूं नका. वैदिक संस्कृतीचा अभ्यास करणारांनी ही