पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अण्णासाहेबांचा बाळपणचा स्वभाव जसेजसे हे मोठे होऊं लागले, तसे तसे यांचे एक एक गुण प्रकट होऊं लागले. हट्टीपणा, अवचट स्मरणशक्ति, शरीरसामर्थ्य, दयालुत्व, अलोलुपत्व, तेजस्विता, प्रखर स्वाभिमान, निर्भयता, कोणत्याही गोष्टीची प्रत्यक्ष अनुभव घेऊन खात्री करून घेण्याची तयारी, विश्वकुंटुबिता, आणि या सर्वांच्या जोडीला निःसीम श्रद्धा, कर्मठपणा, वगैरे देवी संपत्ती ओतप्रोत भरलेली ही खाण, काळ, वाढत्या वयाच्या कुदळ्या मारून हळू हळू उघडी करूं लागला. एकटें राहणें किंवा कोणतीही सुखाची गोष्ट एकट्यानें करणे, त्यांना कधींही आवडले नाहीं. दहा पंधरा समवयस्क स्नेह्यांच्या तांड्यांत ह्योरक्याप्रमाणे ते सांपडत. ही सर्व मंडळी नेहमीं त्यांच्या घरी पडलेली असत. कांहींची घरें गांवांत असून देखील त्यांचें निजणे बसणे यांच्या येथेंच असे. सर्व प्रकारच्या मर्दानी खेळांचा नाद यांना असे, व विशेषतः त्यांत दांडगाई व मारामारी यांत तर त्यांना विशेषच आनंद; तरीपण त्यांपैकी एकाद्यांत विशेष प्राविण्य त्यांनी संपादिलें होतें, असें दिसत नाही. त्यांचे डोकें प्रथमपासून मोठमोठ्या विष- यांत गढून गेलेले असे. इतकेंहि असून त्यांचा व्यासंग, ज्ञान व अवलोकन ही चौरस होती. त्यांच्या बाळपणींच्या गोष्टी सांगणारें कोणी उपलब्ध नस- ल्यानें त्यांच्या आयुष्यांतील मोठ्या मौजेच्या भागास आपणास अंतरावें लागत आहे. तरांही या वेळच्या काहीं त्रोटक गोष्टी त्यांच्या तोंडच्या ऐकलेल्या सांगतां येतील. १० , भय म्हणून काय पदार्थ आहे, हे त्यांना मुळापासूनच ठाऊक नव्हतें. त्यांना एकदां प्रश्न केला होता की 'तुम्ही पिशाच पाहिले आहे काय ? तेव्हां ते म्हणाले ‘ होय. ' मी विचारले की ' केव्हां पाहिले व कोठें पाहिलें?’ यावरून त्यांनी सांगितलें कीं 'लहानपणी सुमारें बारा वर्षाचे असतां आम्हीं मुळे मुले बंगलीत बसत उठत असूं. एक दिवस रात्रीं ( रात्र काळोखी कीं चांदणी होती तें त्यांनी सांगितलें, पण माझे लक्षांत नाहीं, बहुत करून चांदणी रात्र असावीसें वाटतें ) खेळ चालला असतां मीं उठून सहज रस्त्या- कडे पाहिलें. तों तें रस्त्यांत खिडकी समोरच खेळत होतें. लहान मुलें गाय भिंगाऱ्या करतात त्याप्रमाणे स्वतःभोवती गिरक्या घालून ते लहान मोठें होत होतें. ' मी विचारले ' मग तुम्ही काय केलें ? ' ते ह्मणाले 'मला मोठी मौज वाटली, आणि मी सर्व मुलांना बोलावून ' तें पहा कसें खेळत आहे!"