Jump to content

पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/३०८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२८४ वैद्यकी असलेल्या डॉक्टरांना अर्थातच असें करणें नादिष्टपणाचें वाटे. जरा जास्त अवस्थॆतला एकादा स्त्रीरोगी आला असतां, लगेच लेडी डॉक्टरकडून गर्भाशयाची वगैरे परीक्षा करून घेण्यास सांगत, व क्वचित्प्रसंगी एक्सरेजचे फोटो वगैरे घेण्यास सांगत. पूर्वी कँपमधें मिस रोज ही डॉक्टरीण प्रसिद्ध असल्यामुळे बहुत- करून तिच्याकडे जावयास सांगत, व अलीकडे मिसेस कीर्तने या डॉक्टरिणी- कडे जावयास सांगत. अण्णासाहेव यांस कशात ऱ्हेची माहिती लागे, हे त्यांनाहि ठाऊक असल्यामुळे त्यांच्याकडून परीक्षा करून घेणेंच रोग्यास इष्ट असे. मूत्रपरीक्षा, करण्याचे काम बहुतेक डॉक्टर छत्रे यांचेकडे येई, व एरवीं कांहीं आंग्लवैद्यकाचा संबंध लागल्यास डॉक्टर सुंदरलाल मोदी यांच्याकडे जावयास सांगत. अगदी पूर्वी यांनी औषधें सांगावीं व ज्याने त्यानें, अथवा जमलेल्या लोकां- पैकीच कोणी तरी फेरबदलानें लिहून द्यावी, असे चाले. अखेरच्या पंधरा सोळा वर्षांत रा. पाळंदे यांनी काढिलेले व पुढे भिषग्रन गंगाधर कृष्ण जोशी यांनी चालावलेले काष्टीषघी विकण्याचे दुकान निघालें. त्याच्याकरतां म्हणून ते स्वतःच लिहावयास बसत, व स्वतःचे छापील फार्मही लिहिण्यास घेत. या योगानें लोकांची सोय होऊन शास्त्रीबोवांचेंही कल्याण झाले. असो. अशा- रीतीनें हैं काम वर्षानुवर्ष अव्याहत चालले होतें, आणि त्यामुळे शेंकडों हजारों तर काय, परंतु लक्षावधी लोकांचे कल्याण झाले. त्याचा इतिहास जर प्रयत्नपूर्वक कोणी मिळविला तर आर्यवैद्यकास अतिशय अमूल्य लाभ होईल, यांत संशय नाहीं. वैद्यशास्त्राच्या दृष्टीने स्वतःजवळ असलेल्या दुकानच्या याद्यांवरून अखेरच्या १५/१६ वर्षांचा आपला अनुभव' वैद्य गंगाधरशास्त्री यांनी लोकांपुढे मांडून आर्यवैद्यकाची अमोल सेवा करण्याचे श्रेय अवश्य घ्यावें, अशी आमची त्यांस विनंति आहे.