पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

. श्रीअण्णासाहेबांचा जन्म. कळला. इतकें झाल्यावर मग प्रदक्षिणा थांबल्या. परंतु दर्शनास जाण्याचा पाठ मात्र सुरूंच होता. नंतर त्यांनी चतुर्थीत सुरू केले. संकष्टी चतुर्थीला सूर्योदयापासून तो चंद्रो- दयापर्यंत उभ्या राहून त्या जप करीत. असे करतां करतां २१ चतुर्थ्या पुऱ्य झाल्यावर त्यांना दिवस राहिले. त्यावेळी त्यांना पूर्वीसारखी कांहीं भीति वाटत नव्हती. आपणास पुत्र होणार म्हणून खाली असल्याकारणानें एक प्रकारचा आनंद वाटत होता. रीतीनें पूर्ण दिवस झाल्यावर शके १७६९ च्या वैशाख व ४ स प्रातःकाळी सुखप्रसूती होऊन श्रीअण्णासाहेबांचा जन्म झाला. त्यावेळी मूळ नक्षत्र असून मंगळवार होता. ( इ. स. १८४७ मे ४ ). त्यावेळची एक आख्यायिका ऐकण्यांत आहे. नाना चित्राव नित्यनियमा प्रमाणे श्रींचें ध्यान करीत होते. तो ध्यानमूर्ति नेहमीप्रमाणे न दिसतां पायांत साखळ्या आणि तोडर घालून आनंदाने नाचत असलेली अशी बालस्वरूपी दिसूं लागली. त्यासरसे श्रीगजाननाचा अवतार झाला, असे समजून त्यांनी ध्यान विसर्जन केलें, व डोळे उघडून चौकशी करतात तो जानकीबाई आज अजून दर्शनास आली नसल्याचें त्यांना समजलें. तेव्हां त्या बाळंत होऊन त्यांना पुत्ररत्न झालें, असे त्यांनी सांगितल्यावरून मंडळींनी चौकशी केली तो खरेंच ! भाऊसाहेबांनी मुलाचे नांव विनायक ठेविलें. ८ नवानवसाने झालेले मूल, तेव्हां त्याचें लालनपालन किती कौतुकानें झालें असेल, हें कांहीं सांगावयास नको. अण्णासाहेबांचें हाडपेर जन्मापासूनच बळकट आणि बांधेसूद होतें. रंग खरोखरच एखाद्या कागदी निंबासारखा सुंदर होता. इतकें असून ते अत्यंत नाजूक होते. क्वचित् प्रसंगी त्यांच्या करचरणादिकांस स्पर्श करावयाची संधी सुदैवानें येई; त्यावेळी त्या रेशमाप्रमाणे मऊ लागणाऱ्या आणि कोवळ्या आम्रपल्लवांप्रमाणे पातळ वाटणाऱ्या त्वचेची मोठी मौज वाटे. बाळपणीं तर अर्थातच ते अधिकच मनोहर दिसत असतील. अत्यंत लहान- पणापासूनच म्हणजे केवळ ५१६ महिन्यांचे होते, तेव्हांपासूनच-त्यांचें अंगीचे हट्टीपणा, धर्मभोळेपणा, विषयसेवनाविषयीं तिटकारा वगैरे गुण प्रकट झाले होते. देवाचा अंगारा लावला असतां रडत असले तरी थांबणें, तेल अंगास लाविलें कीं तें धुवून टाकीपर्यंत सारखें रडत राहणें, वगैरे गोष्टी नित्याच्याच असत. न्हाऊं घालणे म्हणजे तर एक मोठा समारंभच होता. कमीत कमीं