पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/२८५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

त्यांची पुण्यस्मृति हाच मार्गोपदेशक. २६१ साहेब वारल्यानन्तर मराठी भाषेंतच त्यांचे चरित्र व्हायला पाहिजे होतें एव- ढेच नव्हे तर इंग्रजी, बंगाली, कानडी, हिन्दी ह्या सगळ्या भाषांत त्यांचें चरित्र व्हायला पाहिजे होतें. कारण आमची खात्री आहे की वंगभूमीनें जसा रामकृष्ण निर्माण केला, किंवा पंजाबनें जसे रामतीर्थांसारखें रत्न इहलोकांत आणलें त्या महत्त्वाचें – त्या किंमतीच– हेंही रत्न होतें. आमची महाराष्ट्र- भूमीं अशी वन्ध्या खर्चात नाहीं की जी रामकृष्ण किंवा रामतीर्थासारखी पुत्ररत्नें प्रसवत नाहीं ! हैं रत्न त्याच काळचें होतें- त्याच वृत्तीचें होतें- त्याच वैराग्याचें होतें- त्याच ज्ञानाचें होतें– त्याच पारमार्थिक योग्यतेचें होतें- किंबहुना भीष्माचार्याप्रमाणे प्रायोपवेशनांत आपल्या इहलोकची यात्रा संपवि- विणारा महापुरुष अनेक शतकांत हा पहिलाच | दुसरा कोणी असेल तर सांगा व पुण्यनगरीच्या अपूर्व पुरुषरत्नांत ह्याचा “ क्रमांक " त्यांचे वरती लागतों की खालती लागतो ह्याचा विचार करा.

पुण्यशील पुरुषांच्या सद्वृत्तीनी, स्वजनसेवेनें, पुण्येच्छांनी पुण्यांशांना, परिपूरित, मंडित-- उज्ज्वलित-- गौरवित अशा या शहराला अण्णासाहेब पटवर्ध- नांच्या पुण्यस्मृतीचा वियोग कसा पत्करेल ? त्यांच्या विश्वप्रेमाचा--सरलतेचा-- ·लीनतेचा -- समतेचा व पवित्रतेचा एवढा झेंडा या पुण्यनगरीवर अखंड फडकत राहील की पुढील पिढ्यांना त्यांचेवरून मार्गोपदेश होईल आणि ते विस्मित पूज्यबुद्धीनें नेहमीं असें म्हणत राहतील कीं हा पहा महाराष्ट्रीय रामकृष्ण परमहंस - हा पहा पुनर्जन्मित याज्ञवल्क्य किंवा एकनाथ ! ( २४५ पानावरील टीप. ) The_particle न or नहि which means no, not, etc is purely Vaidik, and its meaning of negation can be derived from the philosophy of the series and sequence of the Vaidik Alphabet alone, and from no other source. It has been also said that the labial letter म bhas many functions. Being the last letter of the upper or nasal arc, along which the four nasals ङ्, त्रु, ण, न suc-